Shraddha Murder Case : आफताबची होणार पॉलीग्राफी, नार्को टेस्ट; श्रद्धाच्या हत्येमागील सत्य होणार उघड | पुढारी

Shraddha Murder Case : आफताबची होणार पॉलीग्राफी, नार्को टेस्ट; श्रद्धाच्या हत्येमागील सत्य होणार उघड

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मुळची मुंबईची असणाऱ्या श्रद्धाच्या हत्त्ये प्रकरणात आरोपी प्रियकर आफताब अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही. तपास भरकटवण्यासाठी तो सातत्याने खोटे बोलत आहे. दरम्यान, आरोपी आफताबच्या पॉलिग्राफी आणि नार्को टेस्टनंतर श्रद्धा हत्याकांडातील सत्य लवकरच जगासमोर येणार आहे. (Shraddha Murder Case)

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप असलेला आफताब खोटे बोलून फार काळ सुटू शकणार नाही. खरं तर, १८ मे २०२२ रोजी श्रद्धाच्या हत्येनंतर मृतदेहासोबत क्रूर कृत्य करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाची नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टद्वारे सत्य समोर येईल. (Shraddha Murder Case)

प्रथम पॉलीग्राफी चाचणी केली जाईल (Shraddha Murder Case)

दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयातील महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्या न्यायालयात पॉलीग्राफ चाचणीसाठी अर्ज केला आहे, जो महानगर दंडाधिकारी विजयश्री राठोड यांच्या न्यायालयात पाठविण्यात आला आहे. गुरुवारीच नार्को चाचणीसाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली असली तरी त्यापूर्वी पॉलिग्राफ चाचणी होणार आहे. त्यामुळेच सोमवारी नार्को चाचणी होऊ शकली नाही.

सत्य जाणून घेण्यासाठी पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी केली जात आहे

आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते मेहरौलीच्या जंगलाशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. यासोबतच त्याने खून प्रकरणाशी संबंधित इतर पुरावेही नष्ट केले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पोलीस याबाबत आफताबची चौकशी करत आहेत, मात्र तो पोलिसांना योग्य माहिती देत ​​नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास गुंतागुंतीचा होत आहे. अशा स्थितीत पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना आफताबकडून अशा काही प्रश्नांची सत्यता जाणून घ्यायची आहे, जेणेकरून तपासाला योग्य दिशा मिळू शकेल आणि खून प्रकरणाशी संबंधित ठोस पुरावे गोळा करता येतील. यासोबतच आफताबला शिक्षा होण्यासाठी तर्क आणि पुराव्याच्या लिंक जोडल्या जाऊ शकतात.


अधिक वाचा :

Back to top button