‘त्याने’ सादर केले नपुसंक असल्याचे प्रमाणपत्र; मुलांची होणार डीएनए टेस्ट | पुढारी

‘त्याने’ सादर केले नपुसंक असल्याचे प्रमाणपत्र; मुलांची होणार डीएनए टेस्ट

कोच्ची: पुढारी ऑनलाईन : पती नपुसंक असूनही दोन मुले झाल्याने एका सैन्यदलातील जवानाने केरळ हायकोर्टात धाव घेतली असून आता त्याच्या दोन मुलांची डीएनए टेस्ट होणार आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने डीएनए टेस्टला मंजुरी दिली.

न्यायमूर्ती ए मोहम्मद मुश्ताक आणि कौसर एउप्पागथ यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

संबधित व्यक्ती सैन्यदलात असून २००६ मध्ये त्याचे लग्न झाले होते. तो २२ दिवसांच्या सुटीनंतर ड्युटीवर गेला.

त्यादरम्यान त्याचे पत्नीशी शारीरिक संबंध आले नाहीत. तरीही ती गरोदर राहिली. २००७ मध्ये त्यांना मुलगा झाला.

त्यामुळे त्याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्याला झालेले मूल हे अन्य व्यक्तीचे आहे असा त्यांचा तेव्हापासून संशय होता.

७ मे २००६ रोजी या दाम्पत्याचे लग्न झाले. त्यानंतर त्यांना ९ मार्च  २००७ रोजी मुलगा झाला.

यादरम्यान केवळ २२ दिवस पती-पत्नी एकत्र होते. पतीचा दावा असा आहे की, या २२ दिवसांत त्यांच्यात संबंध आला नाही.

त्यामुळे पत्नीने केलेली फसवणूक सिद्ध करण्यासाठी त्याने डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली.

या याचिकेवर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

दोन खटल्यांचा संदर्भ

यासाठी २०१४ चा नंदलाल वासुदेव बडवाईक विरुद्ध लता नंदलाल बडवाईक आणि २०१५ चा दीपनविता रॉय विरुद्ध रोनोब्रतो रॉय यांच्या खटल्याचा संदर्भ देण्यात आला.

या दोन खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवलेले मत ग्राह्य धरले. डीएनए चाचणी वैज्ञानिक दृष्ट्या खूप विश्वासार्ह आहे.

ती चाचणी जर विरोधात गेली तर फसवणूक झाल्‍याचे सिद्ध करण्यास अनुमती दिली जाऊ शकते.

याचिका मंजूर करताना हायकोर्टाने आणखी एक गोष्ट नमूद केली की, याचिकाकर्त्याने तिरुवअनंतपुरम मेडिकल कॉलेजमधून आपण नपुसंक असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे.

त्यामुळे हे प्रकरण ठोस वाटत आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट करण्यास मंजुरी देण्यात येत आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button