Sai Tamhankar : फूलमती💜; ब्ल्यू शॉर्टमध्ये बोल्ड झाली सई | पुढारी

Sai Tamhankar : फूलमती💜; ब्ल्यू शॉर्टमध्ये बोल्ड झाली सई

पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर याच्या आगामी ‘इंडिया लॉकडाऊन’ (India Lockdown) हा चित्रपटातून मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सई अभिनेत्री प्रतीक बब्बर याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तिने ‘फूलमती’ ची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. सई ‘इंडिया लॉकडाऊन’ च्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या बिझी आहे. याच दरम्यान सईचे एकापैक्षा एक हॉट फोटो समोर येत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही हॉट फोटोज शेअर केले आहेत. यात सई ब्ल्यू कलरच्या शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये एकदम हटके दिसतेय. कुरळ्या मोकळे केस, रेड लिपस्टिक, हाय. हिल्स आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘इंडिया लॉकडाऊन Promotions’ असे लिहिले आहे. यावरून सई ताम्हणकर तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे समजते. या फोटोच्या बॅकग्राऊडला निळ्या- पिंक रंगाच्या आकर्षक पडदा दिसतोय. यात सई खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पडला आहे. यात एका युजर्सने Phoolmati, uffff 💙, ❤️ beautiful ❤️, ❤️ just say ..all time Favourite..SAI, Lovely, So wonderful sai mam😍😍, Nice pic 😍, Beautiful queen, Marathi bold actor 🔥😍, Queen of millions hearts❤️❤️, 🔥 fire fire❤️❤️, Beautiful sweetheart darling I love you❤️❤️, Hottie 💖😘, So cute and very beautiful, ❤️ kay bat h, Ohhhhhhhhhh mam❤️, ❤️❤️ looking fantastic. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. आतापर्यत या फोटोला ७० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

याआधीही सईने ग्रीन रंगाच्या शॉर्ट ड्रेस आणि न्यूड मेकअपमधील फोटो शेअर केलं आहेत. या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. सईसोबत आगामी ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबत सई ( Sai Tamhankar ) सोशल मीडियावर सक्रिय असते. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)


\

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

Back to top button