मुंबईत रेकी अटक केलेल्‍या दहशतवाद्‍याकडून नाही : महाराष्‍ट्र एटीएस | पुढारी

मुंबईत रेकी अटक केलेल्‍या दहशतवाद्‍याकडून नाही : महाराष्‍ट्र एटीएस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दिल्‍ली पाेलिसांनी अटक केलेल्‍या  दहशतवाद्‍याकडून मुंबईत रेकी करण्‍यात आलेली नाही. दहशतवादी जान मोहम्‍मद शेख याने मुंबईत रेकी केलेली नाही. त्‍याच्‍याकडून माहिती घेण्‍यासाठी महाराष्‍ट्र एटीएसचे  पथक आज सायंकाळी दिल्‍लीला रवाना होईल, अशी माहिती महाराष्‍ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जान मोहम्‍मद शेख हा मुंबईतील धारावी येथील रहिवासी आहे. तो गोल्‍डन टेम्‍पल ट्रेनने दिल्‍लीला गेला होता, अशीही माहिती एटीएस प्रमुख अग्रवाल यांनी दिली.

जान मोहम्‍मदचे अंडर वर्‍ल्डबरोबर संबंध असल्‍याचेही माहिती तपासात समोर येत आहे.कारवाईसाठी मुख्‍यंमत्री आणि गृह मंत्र्‍यांनी पोलिसांना पूर्ण मोकळील दिली आहे., असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जान मोहम्‍मदची आर्थिक परिस्‍थिीत मागील काही दिवसांपासून हालाख्‍याची आहे.

त्‍यामुळे तो दहशतवाद्‍यांच्‍या संपर्कात आला असावा.

जान मोहम्‍मद याने मुंबईत रेकी केलेली नाही. तसेच तो धारावी येथील रहिवासी आहे. परदेशी नागरिक नाही.

त्‍यामुळे महाराष्‍ट्र एटीएसचे अपयशी ठरल्‍याची चर्चेचा संबंध नाही, असेही अग्रवाल यांनी स्‍पष्‍ट केले.

२० वर्षांपासून अंडरवर्ल्डशी संबंध

जान मोहम्‍मद शेख त्‍याच्‍याविरोधात गोळीबार, शिवीगाळ, मारहाणाीचे गुन्‍हे यापूर्वीच दाखल झाले आहेत.

त्‍याचे २० वर्षांपासून अंडरवर्ल्डशी संबंध हाेते. तो पोलिसांच्‍या रडावर होता.

मुंबईत विदेशी नागरिकाने रेकी केलेली नाही, मुंबई शहरासह महाराष्‍ट्र राज्‍य पूर्ण सुरक्षित आहे, असेही अग्रवाल म्‍हणाले.

संशयित कोणत्‍या राज्‍यात आहे यानुसारचव कारवाई होते.

यामुळे संबंधित कारवाईत दिल्‍ली पोलिसांनी महाराष्‍ट्र पाेलिसांना  माहिती देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही, असेही ते म्‍हणाले.

जान मोहम्‍मद शेख  याच्‍या विराेधात  मुंबई पोलिसात अनेक गुन्‍हे दाखल होते.

मागील काही दिवसांपासून जान मोहम्‍मद शेख याची आर्थिक परिस्‍थिती हालाखीची होती.

तो कर्जबाजारी झाला होता, अशीही माहिती अग्रवाल यांनी दिली.

दिल्‍ली पोलिसांनी दहशतवादी हल्‍ल्‍याचा कट उधळला

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी कट मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उधळून लावला. मुंबईत धारावीत राहणार्‍या जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्‍या.

ऐन दिवाळी दसर्‍यात कुठे आणि कसे घातपात घडवायचे याचे प्रशिक्षण या टोळीला डॉन दाऊदचा सख्खा भाऊ अनिस इब्राहिम देत होता. पाकची पातळयंत्री गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अनिसला हे घातपाताचे कंत्राट दिले होते, अशी माहिती दिल्ली पोलिस दलाचे विशेष आयुक्त नीरज ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली हाेती.

धारावीतील कालिया

दाऊदच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह देशभरात घातपात घडवण्यास निघालेल्या सहा पैकी एक जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया हा ४७वर्षीय अतिरेकी अंडरवर्ल्डचा हस्तक म्हणून ओळखला जातो.

धारावीतील केलाबखरमध्ये तो लहानाचा मोठा झाला. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचे निधन झाले. पत्नी आणि एक 22 वर्ष आणि एक 11 वर्षाच्या मुलीसह तो इथे राहतो.

तो चालक म्हणून काम करत असे. स्वत: कमी शिकलेला पण त्याच्या दोन्ही मुली शिक्षण घेत होत्या.पत्नी हाताला मिळेल ते काम करते. काही रहिवाश्यांनी त्याला सोमवारी दुपारी घराच्या परिसरात पाहिले होते.

मंगळवारी त्याला अटक होताच सर्वांनाच धक्का बसला. कालीयाला अटक झाल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष चार आणि पाच आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस त्याच्या घरी मंगळवारी संध्याकाळी पोहचले.

सुमारे दोन ते तीन तास पोलिसांनी या कुटुंबाची चौकशी केली.

नंतर त्यांना धारावी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.पोलिसांनी आजू बाजूचा विभाग तपासला, घराची झडती घेतली शेजार्‍यांकडे देखील विचारपूस केली आहे.

मुंबईत त्याचे आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध घेतला जात आहे.

धारावीतील समीर कालिया हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या अत्यंत जवळच्या हस्तकासाठी काम करतो. त्याचे कार्यक्षेत्र मुंबईच राहिले

. मात्र, ऐन सणासुदीत घातपात करण्यासाठी या हस्तकाने समीरची निवड केली आणि पाकिस्तानात बोलावत त्याला प्रशिक्षणही दिले. ज्या ठिकाणी स्फोट घडवायचे होते

त्या सर्व ठिकाणी अत्यंत स्फोटक आयईडी पोहोचवणे, अतिरेक्यांसाठी शस्त्रास्त्रे तसेच हातबॉम्ब पोहोचवण्याची जबाबदारी समीर कालियावर टाकण्यात आली होती. राजस्थानातील कोटा येथून दिल्लीकडे जात असतानाच त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

हेही वाचलं का ?

 

Back to top button