मराठा आरक्षणाअभावी नैराश्यातून युवकाची आत्महत्या - पुढारी

मराठा आरक्षणाअभावी नैराश्यातून युवकाची आत्महत्या

जालना; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील येणोरा येथील तरुण सदाशिव शिवाजी भुंबर (22) याने मंगळवारी घरात दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठा आरक्षण आणि ओल्या दुष्काळामुळे त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. सदाशिव भुंबर हा पुणे येथे भावासोबत खासगी कंपनीत नोकरीला होता. तो महिन्यापूर्वी येणोरा येथे गावाकडे आला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आयटीआय कोर्स करूनही मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता.

हेही वाचलत का :

पाहूया गौरीच्या नैवैद्याची मिक्स भाजी आणि थापट वडी कशी करायची

Back to top button