Navratri 2022: नवरात्रीत उपवासासाठी घरीच बनवा स्वादिष्ट ‘उपवासाचा रायता’ | पुढारी

Navratri 2022: नवरात्रीत उपवासासाठी घरीच बनवा स्वादिष्ट 'उपवासाचा रायता'

पुढारी ऑनलाईन: नवरात्रीच्या कालावधीत काही जण घट बसताना आणि घट उठताना असे दोन दिवस किंवा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. उपवासाला काही जण फळे, दूध, ताक, खजूर यांसारखे पदार्थ खातात, पण उपवासात दिवसभर उत्साही राहण्यासाठी तसे पदार्थही खाणे आवश्यक आहे. यासाठी अनेक प्रकारच्या रायत्याचा तुम्ही फराळात समावेश करू शकता. यामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. तसेच हे बनवायला खूप सहज आणि सोपे आहेत…चला तर पाहुयात कसा बनवायचा उपवासाचा रायता…

काकडीचा रायता

हा रायता बनवण्यासाठी एक वाटी घरगुती दही घ्या. त्यात किसलेली काकडी घाला. त्यात चवीनुसार सैंधव मीठ घाला. या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घ्या. यामध्ये सजावाटीसाठी तुम्ही वरून कोथिंबीर आणि डाळींबाचे दाणेही टाकू शकता. तुम्हाला हवे असल्यास यामध्ये जिरे भाजून देखील घालू शकता.

बीटचा रायता

 

एका भांड्यात दही घ्या. त्यात एक किसलेले बीट घाला. चवीनुसार सैंधव मीठ आणि अर्धा टीस्पून जिरे घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता या रायत्याचे सेवन करा.

अननस रायता

एका पॅनमध्ये मॅश केलेले अननस घ्या. त्यात साखर घालून थोडा वेळ ते गरम करून घ्या. त्यात अननसचे छोटे-छोटे तुकडे टाका. अननसचे तुकडे थोडा वेळ शिजवून घ्या. यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थोडावेळ थंड झाल्यानंतर आता त्यात दही मिक्स करा. सैंधव मीठ आणि भाजलेले जिरे घालून हे मिश्रण मिक्स करून घ्या यानंतर हे खाण्यासाठी तयार होईल.

बटाटा रायता

प्रथम १ ते २ बटाटे उकडून घ्या. त्यांना सोलून ते व्यवस्थित स्मॅश करा. आता एका भांड्यात दही घ्या. त्यात मॅश केलेले बटाटे, सैंधव मीठ आणि भाजलेले जिरे घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. यानंतर हा रायता खाण्यासाठी तयार होईल. हा रायता अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे.

हेही वाचा:

Back to top button