Upwasacha Dosa: उपवासाचा कुरकूरीत डोसा

Upwasacha Dosa
Upwasacha Dosa
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: श्रावण म्हटलं की उपवासाचा महिना. उपवासाला साबुदाणा खिचडी, वरई, बटाट्याची भाजी, फ‍ळे याचं आप‍ण सेवन करतो.  याशिवाय खावं तरी काय? वेगळं काही बनवायचं असेल तर नेकमं ते उपवासाला चालेल का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. चला तर पाहूयात बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा उपवासाचा कुरकूरीत डोसा नेमका बनवायचा तरी कसा?

साहित्य

• १/२ कप वरी
• १/४ कप साबुदाणा
• १/४ कप दही
• १/४ कप पाणी
• चवीनुसार मीठ
• साजूक तूप किंवा  तेल

बटाटा भाजीसाठी

• १ चमचा साजूक तूप
• १/२ चमचा जिरं
• आलं-हिरव्या मिरचीचा ठेचा
• उकडून सोललेल्या बटाट्याच्या फोडी
• भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर (गरजेनुसार)

कृती:

•वरी आणि साबुदाणा एकत्र करून ३-४ वेळा पाण्याने धुवून रात्रभर किंवा किमान ५-६ तास पाण्यात भिजवा.
•सकाळी त्यातील सर्व पाणी काढून टाका. भिजवलेली वरी आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात बारीक करा.
• हे मिश्रण प्रथम सुकंच पाणी न घालता रवाळ बारीक करा. त्यानंतर यामध्ये १/४ कप दही, १/४ कप किंवा गरजेनुसार पाणी घाला.
• यामध्ये दह्याऐवजी १/२ कप ताक किंवा १ किंवा २ चमचा लिंबाचा रस देखील वापरू शकता.
• तयार झालेले हे मिश्रण एका भांड्यात काढा त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते एकजीव करून घ्या.
• त्यानंतर हे पीठ १० ते १५ मिनिट झाकणाने झाकून ठेवा.
• दुसरीकडे मध्यम आचेवर एक पॅन गरम करा. त्याला तुप किंवा तेल लावून थोडावेळ ठेवा. पॅन जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या.
• पॅनच्या मध्यभागी पीठ घाला आणि समान रीतीने हे पीठ गोलाकार पसरा. त्यानंतर ते झाकूण ठेऊन, एक मिनिट सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

अशी बनवा चविष्ट बटाटा भाजी

• कढईत तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे टाका. यामध्ये आले-हिरवी मिरची पेस्ट घालून एक मिनिट चांगले परतून घ्या. तुम्हाला हे नको असल्यास वगळू शकता.
• कढईत मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता.
• यामध्ये उकडून सोललेल्या बटाट्याच्या फोडी, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, मीठ टाकूण व्यवस्थित मिक्स करा.
• कढईवर झाकण ठेवून ५-६ मिनिटे तयार झालेली बटाटा भाजी चांगली वाफवून घ्या.
• परत झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घ्या. गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर घाला.

झटपट होणारा उपवासाचा डोसा ही रेसिपी नक्की बनवून पाहा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news