Shravan Food : उपवासाची हलकी फुलकी उसळ | पुढारी

Shravan Food : उपवासाची हलकी फुलकी उसळ

पुढारी ऑनलाइन डेस्क : श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण श्रावण मास किंवा श्रावणातले काही दिवस उपवास करतात. सातत्याने उपवास असल्याने उपवासासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो. तसेच रोजचा स्वयंपाक सांभाळून उपवासासाठी वेगळा पदार्थ करायचा असल्याने अनेक महिलांची खूप तारांबळ उडते. यासाठी आज अतिशय झटपट होणारी उपवासाची ही उसळ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

साहित्य – बटाटे, शेंगदाणे, तूप, हिरवी मिरची, दही आणि चवीनुसार मीठ

कृती – बटाटे आणि शेंगदाणे उकडून घ्या. मिरचीचे बारीक तुकडे करून घ्या. उकडलेले बटाटे सोलून घ्या. नंतर बटाटे आणि शेंगदाणे एकत्रित पणे कुस्करून घ्या. कढईमध्ये थोडे तूप टाकून गरम करून घ्या. गरम-गरम तुपात मिरचीचे तुकडे टाकून थोडे बदामी करून घ्या. कुस्करलेले बटाटे आणि शेंगदाणे टाका तिन्ही मिश्रण एकजीव करून हलकेच भाजा. त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा थोडे भाजून घ्या. आता ही चविष्ट उसळ तयार आहे.

प्लेटमध्ये मऊ मलाई दही उसळवर घालून खा…नक्की करून पाहा बरं…

Back to top button