वॉशिंग्टन ः व्हर्जिन गॅलेक्टिक'ने अंतराळ सफरीवर नेणार्या यानातील तिकिटाची किंमत आधी घोषित केलेल्या किमतीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे.
जेफ बेजोस आणि रिचर्ड ब—ान्सन यांच्या अंतराळ प्रवासानंतर आता अंतराळात जाण्याचा ट्रेंड वाढत आहे. जेफ बेजोस यांच्याजवळची सीट मिळवण्यासाठी 159 देशांमधील 7600 लोकांनी बोली लावली होती. अंतिम बोली सुमारे 21 कोटी रुपयांची होती. ही 'क्रेझ' पाहून ब—ान्सन यांच्या मालकीच्या 'व्हर्जिन गॅलेक्टिक'ने अंतराळ सफरीवर नेणार्या यानातील तिकिटाची किंमत आधी घोषित केलेल्या किमतीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे.
कंपनी आता एका सीटचे तिकीट 3.35 कोटी रुपयांमध्ये विकत आहे. यापूर्वी तिकिटाचे शुल्क 1.8 कोटी रुपये होते. या किमतीवर 600 लोकांनी तिकीट खरेदीही केले होते. 'व्हर्जिन गॅलेक्टिक'चे सीईओ मायकल कोलग्लजियर यांनी सांगितले, आम्ही वैश्विक लोकसंख्येसाठी नव्या व्यवसायाचे दालन खुले करून आम्ही आनंदी आहोत. दरवर्षी शेकडो स्पेस फ्लाईट संचालित करण्याची आमची योजना आहे. कंपनी लवकरच 'युनिटी 23' नुसार इटालियन हवाई दलाच्या तीन सदस्यांना अंतराळात घेऊन जाणार आहे. तीन दिवसांच्या प्रशिक्षणाबरोबर प्रतिसीट 4.3 कोटी रुपयांमध्ये बुकिंग झाले आहे. सुरुवातीच्या 600 सीट बुक आहेत. फ्लाईटच्या आधी तीन दिवसांच्या प्रशिक्षणाच्या काळात प्रवाशांना वेगळा अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध डिझायनर जो रोहडे यांच्याशी करार करण्यात आला आहे. त्यांनी डिस्ने इमेजिनिअरिंगमध्ये चार दशके व्यतित केली आहेत. तसेच अॅनिमल किंगडमसाठी प्रमुख डिझायनर म्हणून काम केले आहे.