Shravan Food : श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा? ही आहेत ‘महत्त्वपूर्ण’ कारणे…  | पुढारी

Shravan Food : श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा? ही आहेत 'महत्त्वपूर्ण' कारणे... 

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण 29 जुलैपासून सुरू होत आहे (Shrawan somwar 2022) आणि श्रावणाचा शेवटचा दिवस 27 ऑगस्ट आहे. श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीमध्ये महत्वपूर्ण स्थान आहे. श्रावण सुरु झाला की उपवासांची रेलचेल असते. या महिन्यात मासांहार (Nonvege) पूर्णपणे टाळून हलकासा आहार (Shravan Food) घेण्यावर लोकांचा भर असतो. श्रावण महिन्यात हलकासा आणि शाकाहार घेण्याला काही शास्त्रीय कारणे आहेत. ती कारणे नेमकी कोणती आहेत हे आपण पाहूया.

 Shravan Food : पचनक्षमता मंदावते

पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे, हवामानातील आर्द्रतामुळे या दिवसात मानवी पचनसंस्थेची क्षमताही मंदावलेली असते.  पचनक्षमता कमजोर असल्यामुळे या दिवसात  हलक्या आहाराला प्राधान्य दिले जाते. मासांहार हा पचायला वेळ लागत असतो. जर का तुम्ही या दिवसात मासांहार केला तर तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात मांसाहार टाळला जातो.  मांसाहार केल्यास तो पचायला वेळ लागतो याचा विपरित परिणाम आतड्यांवर होतो.
अन्न लवकर खराब 
पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे एक प्रकारचा दमटपणा असतो. या दमटपणामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. या दमटपणाचा परिणाम मांसाहारावरही अधिक होत असतो. त्यामुळे या दिवसात मांसाहार टाळून हलका आहार घेतला जातो.

प्राण्यांचा प्रजनन काळ

हा काळ हा किटक, प्राणी यांचा प्रजनन काळ हा प्रामुख्याने मानला जातो. आपण जे मासांहारमध्ये खातो, उदा. मासे. असे मांस खाल्ले तर आपल्या हार्मोन्समध्येही बदल होऊ शकतो. त्याचबरोबर पावसाळ्यात अनेक जलजन्य रोग होत असतात आणि प्राण्यांच्या मांसापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मांस खाणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.

 Shravan Food : बुरशीजन्य आणि जिवाणू

पावसाळ्यात शेतजमीन पावसाच्या पाण्याने भरून जाते. भाजीपाला कमी प्रमाणात पाहायला मिळतो.  पावसामुळे पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बुरशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. साठवलेल्या अन्नाच्या बाबतीतही उच्च आर्द्रतेमुळे त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता असते.
श्रावण स्पेशल फुड रेसीपी

Back to top button