WhatsApp द्वारे कसा बुक कराल लसीकरणाचा स्लॉट?

WhatsApp द्वारे कसा बुक कराल लसीकरणाचा स्लॉट?
Published on
Updated on

व्हॉट्सअॅपने ( WhatsApp ) कोरोना लसीकरण बुक करण्यासाठी सहा सोप्या स्टेप्सची सुविधा पुरवली आहे. देशातील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना आता सरकारच्या मायजीओव्ही कोरोना हेल्प डेस्क चॅट बॉक्सच्या सहाय्याने कोरोना लसीकरणाचा स्लॉट बुक करता येणार आहे. व्हॉट्सअॅप ( WhatsApp ) वापरकर्त्यांना फक्त ९०१३१५१५१५ या मोबाईल क्रमांकावर फक्त बुक स्लॉट असा संदेश पाठवायचा आहे.

व्हॉट्सअॅपवरील ( WhatsApp ) हा चॅटबॉक्स पहिल्यांदा मार्च २०२० मध्ये आला होता. मात्र याचा वापर कोरोना संबंधातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि चुकीची माहिती पसरण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आला होता. वापरकर्ते या चॅटबॉक्सद्वारे कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्रही डाऊनलोड करु शकत होते.

आतापर्यंत लसीकरणासाठी नागरिकांना कोविन वेबसाईटचाच वापर करत होते. मात्र आता व्हॉट्सअॅप ( WhatsApp ) द्वारेही नागरिक लसीकरणासाठीचा स्लॉट बूक करु शकणार आहेत.

व्हॉट्सअॅप द्वारे सोप्या पद्धतीने बुक करा लसीकरणाचा स्लॉट

१ – पहिल्यांदा ९०१३१५१५१५ हा व्हॉट्सअॅप क्रमांक आपल्या मोबाईमध्ये सेव्ह करा.

२ – त्यानंतर व्हॉट्सअॅपवर या क्रमांकावर बुक स्लॉट ( "Book Slot" ) असा संदेश पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ६ आकडी ओटीपी पासवर्ड येईल. त्यानंतर हा ओटीपी तुम्ही ९०१३१५१५१५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवा.

३ – एकदा का तुम्ही ओटीपी पाठवला, त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकाने सेव्ह असलेल्या प्रत्येकाचे नाव या चॅटबॉक्समध्ये दिसेल.

४ – त्यानंतर तुम्हाला ज्याचा लसीकरण स्लॉट बुक करायचा आहे त्याचा नंबर टाईप करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पूर्वीच्या लसीकरणाची माहिती दाखवली जाईल.

५ – त्यानंतर तुम्ही सर्च बाय पीन कोड ( "Search by Pincode." ) याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुम्ही हे या लसीकरणाचे पैसे देणार आहात की मोफत हवी आहे असे विचारण्यात येईल.

६ – त्यानंतर तुम्हाला तुमच्या भागाचा पीनकोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुम्हाला सोयीची तारीख आणि ठिकाण निवडू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news