ठाणे : नारायण राणे यांच्या विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा | पुढारी

ठाणे : नारायण राणे यांच्या विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

महापौर नरेश म्हस्के यांनी नौपाडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले आक्षेपार्ह विधान मुख्यमंत्री या घटनात्मक पदाच्या व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकिकास बाधा आणणारा असून या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाली आहे.

तसेच बदनामीकारक व द्वेषभाव निर्माण करणारी वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये शत्रुत्वभाव निर्माण होऊन ठाणे शहरात गटामध्ये संघर्ष होऊ शकतो. या संघर्षात नारायण राणे यांचे वक्तव्य कारणीभूत ठरू शकते.

Pune crime: खून झालेल्या महिलेच्या शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात सापडले

Narayan Rane : नारायण राणे यांना अखेर अटक, संगमेश्वर येथून घेतलं ताब्यात

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेले वक्तव्य राज शिष्टाचाराचा अपमान झालेला आहे. म्हणून माझी नारायण राणे यांच्या विरोधात माझी कायदेशीर फिर्याद आहे, अशी तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 500, 500(2), 153 बी आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी आज (दि. २४) दुपारी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली.

रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राणे यांच्या अटकेनंतर या प्रकरणी घडामोडी वेगाने घडत असून महाड पोलिस नारायण राणे यांना घेऊन महाडकडे रवाना झाले आहेत. राणे यांना आज संध्याकाळी किंवा उद्या महाडच्या न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

महाड: संतप्त शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळला!

राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही पण राणे यांच्या मागे खंबीर; देवेंद्र फडणवीस

नारायण राणे यांच्याविरोधात सर्वात प्रथम नाशिक आणि नंतर महाड, ठाणे, पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान जन आशीर्वाद यात्रेत असणाऱ्या नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलिस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुपारी ३:५० वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कोकण उप महानिरीक्षक नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

कोकण उप महानिरीक्षक संजय मोहिते हे सकाळपासून रत्नागिरीत दाखल झाले आहेत. महाड पोलिसांच्या ताब्यात मंत्री राणे यांना देण्याआधी रायगड एसपी अशोक दुधे यांच्याशी कोकण उप महानिरीक्षक संजय मोहिते यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत सविस्तर चर्चा केली.

त्यानंतर त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्यास्थित रत्नागिरी, नाशिक, रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा पोलिस महासंचालक कार्यालयातील कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी आढावा घेत आहेत. शिवाय सर्व अधीक्षक आणि आयुक्तायाच्या नियंत्रण कक्षेतून परिस्थितीची माहिती मागविण्यात येत आहे.

Back to top button