पाकिस्तानचे माजी फलंदाज रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे कान टोचले. पाकिस्तानची रँकिंग संघ कोणत्याही मोठ्या स्पर्धेत अंतिम फेरीत जाणार नाही हे दर्शवते असे टीकात्मक वक्तव्य केले. त्यांनी बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या संघात सातत्य नसल्याचे सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे पुढेचे प्रमुख कोण असणार याचा निर्णय घेणार आहेत. रमीझ राजा यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे जाण्याची शक्याता आहे किंवा सध्याचे चेअरमन एहसान मणी यांना मुदतवाढ मिळू शकते.
दरम्यान, रमीझ राजा यांनी इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखती म्हणाले, 'मी पंतप्रधानांना भेटलो होतो. आणि त्यांना पाकिस्तान क्रिकेट प्रगतीपथावर आणण्याचा रोडमॅप त्यांच्यासमोर सादर केला. ही क्रिकेट केंद्रीत चर्चा होती. पाकिस्तान क्रिकेट अनेक अडचणींचा सामना करत आहे आणि याच्या सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा झाली. माला आनंद झाला की त्यांनी मला बोलवले आणि माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना सध्याच्या क्रिकेटच्या स्थितीबाबत काळजी आहे आणि ते खुल्या दिलाने चर्चा करण्यास तयार आहेत.'
राजा पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानच्या खेळात तातत्य नाही. तीनही क्रिकेट प्रकारातील पाकिस्तानची रँकिंग पाहिली तर पाकिस्तान कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल असे वाटत नाही. ते टी २० प्रकारात एखाद्यावेळी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत जातील. पण, एकदिवसीय आणि कसोटी प्रकारांचा विचार करता त्यांना साखळी फेरी पार करणे देखील मुश्कील होईल. मी पंतप्रधानांना क्रिकेटबाबतच्या गोष्टींची माहिती दिली. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आता पुढे कसे जायचे हा त्यांचा निर्णय आहे.'
पाकिस्तानची रँकिंग वरुन नाराजी व्यक्त करणाऱ्या रमीझ राजा यांनी इम्रान खान यांची सोमवारी भेट घेतली होती. सध्याचे पीसीबीचे चेअरमन एहसान मणी यांचा कार्यकाळ २५ ऑगस्ट रोजी संपणार आहे. पण, त्यांना कार्यकाळ वाढवून मिळण्याचीही शक्यता आहे. पण, ही वाढ शक्यतो एका वर्षासाठीच असेल.
या वर्षी न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. सध्या पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.
हेही वाचले का?