चीनकडून तैवानची पुन्‍हा कोंडी ! २६ लढाऊ विमाने, ४ युद्धनौकांची तैवानमध्‍ये घुसखोरी

चीनकडून तैवानची पुन्‍हा कोंडी ! २६ लढाऊ विमाने, ४ युद्धनौकांची तैवानमध्‍ये घुसखोरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनच्‍या २६ लढाऊ विमाने आणि चार युद्धनौकांनी तैवानमध्‍ये घुसखोरी केली आहे, अशी माहिती तैवानच्‍या राष्‍ट्रीय संरक्षण मंत्रालयाने ( एमएनडी ) दिली. यासंदर्भात वृत्त आज ( दि. १९ ) तैवान न्‍यूजने दिले आहे. या लष्‍करी कारवाईमुळे चीनने तैवानची कोंडी कायम ठेवल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

यासंदर्भात तैवानच्‍या राष्‍ट्रीय संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले आहे की, शुक्रवार दि. १९ मार्च रोजी चीनच्‍या २६ लष्‍करी विमानांनी घुसखोरी केली. यातील १५ विमानांनी तैवानच्‍या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्‍याचे दिसले. तर उर्वरीत ९ विमानेही दक्षिण भागातील समुद्र सीमेवर दिसली. तैवानने पीएलए विमाने आणि जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी विमाने, युद्धनौक आणि क्षेपणास्त्रे पाठवून प्रत्युत्तर दिले आहे.

चीनमधून या महिन्‍यात आतापर्यंत ६७ युद्धनौका आणि २६६ लष्करी विमानांनी तैवानमध्‍ये घुसखोरी केली आहे. चीनने सप्टेंबर 2020 पासून तैवान मध्ये नियमितपणे विमाने पाठवून ग्रे झोन धोरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला आहे. तीव्र केला आहे. चिनी लष्करी जहाजे, मासेमारी जहाजे आणि वाळूचे ड्रेजर नियमितपणे तैवानच्या पाण्यात जातात ज्याचे वर्णन लष्करी विश्लेषकांनी 'ग्रे-झोन' रणनीती म्हणून केली आहे

चीनच्या सार्वभौमत्वाचा दावा धुडकावत तैवानने यापूर्वी म्‍हटले होते की, बीजिंग प्रादेशिक शांतता नष्ट करत आहे आणि तैवानच्या लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्‍याचे चीनच्‍या कृतीतून स्‍पष्‍ट होत आहे. अनेक चिनी विमाने, मुख्यतः लढाऊ विमानांनी, संवेदनशील तैवान सामुद्रधुनीतील मध्यरेषा ओलांडली. तैवानजवळ सात चिनी युद्धनौका आढळून आल्याचे तैवान राष्‍ट्रीय संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले होते.

चीनने अलीकडच्या काळात स्वशासित बेटावर आपला राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबाव वाढवला आहे. आम्‍हाला शांतता हवी आहे; परंतु हल्ला झाल्यास आम्‍ही स्वतःचे रक्षण करणार, असे तैवान सरकारने यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे.

मागील वर्षी तैवानमध्‍ये अमेरिकेच्‍या प्रतिनिधीगृहाच्‍या सभापती नॅन्‍सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. यानंतर दोन्‍ही देशांमधील तणाव वाढला. गेल्‍या २५ वर्षांमध्‍ये अमेरिकेतील उच्‍चपदस्‍थ नेत्‍याचा हा पहिलाचा तैवान दौरा होता. चीनने या दौर्‍याचा निषेध करत हा दौरा द्वेषपूर्ण असल्‍याचे म्‍हटले होते. तैवान आणि चीन यांचे एकीकरण होणार असल्‍याचा
पुनरुच्‍चारही त्‍यावेळी चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांनी केला होता.

तैवान हे चीनच्‍या अग्‍नेय समुद्र किनार्‍याजवळ असणारे बेट आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची घटना आहे आणि त्यांनीच निवडून दिलेल्या नेत्यांचं सरकार आहे. तैवान हा आमचाच प्रांत आहे. एक दिवशी तो चीनचा भाग होणार आहे, असा दावा चीन करत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news