व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन आता अधिक 'शक्तीमान' होणार ; कोणाचेही मेसेज थेट डिलीट करणार ! | पुढारी

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन आता अधिक 'शक्तीमान' होणार ; कोणाचेही मेसेज थेट डिलीट करणार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्टंट मेसेंजिग ॲप व्हॉट्सॲप आता ग्रुप ॲडमिनना आणखी अधिकार बहाल करण्याच्या तयारीत आहे. ग्रुप चॅटमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये दमदार फिचर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्हर्जन 2.22.11.4 वर ही अपडेट मिळेल.

व्हॉट्सॲप अपडेट ट्रॅक करणाऱ्या WABetainfo नुसार ग्रुप ॲडमिन यांना मेसेज डिलीट करता येतील. ते मेसेज ग्रुप सदस्यांनी पाठवले असले, तरी ते डिलीट होतील. ग्रुप ॲडमिनने तो मेसेज डिलीट केल्यानंतर युझर्सना तो this was removed by an admin असे दिसेल. या फिचर्सवर अजूनही काम सुरु आहे. मात्र, ते फिचर साधारण कसे दिसेल स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे.

WhatsApp will allow Group admins to delete messages sent by participants: Report

त्यांनी तो स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिलं आहे की, जेव्हा या नवीन फिचर रोल आऊट होईल तेव्हा इनकमिंग मेसेज सर्वांसाठी ग्रुपमधून डिलीट करता येईल. मेसेज कोणी डिलीट केला आहे लोकांना समजून येईल आणि व्हॉट्सॲपला माहिती द्यायची आहे.

ग्रुप ॲडमिन अधिक शक्तीमान होणार

या नवीन फिचर्सची अंमलबजावणी झाल्यानंतर अर्थातच ग्रुप ॲडमिन अधिक शक्तीमान होईल. त्यामुळे विनाकारण ग्रुपमध्ये फॉरवर्ड मेसेज टाकून हैराण करणाऱ्यांना या अधिकाराने चांगलाच चाप बसणार आहे.

या अपडेटसह आता व्हॉट्सॲपकडून आणखी एका फिचरवर काम सुरु आहे. डिलीट मेसेज वेळमर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. सगळ्यांसाठी मेसेज डिलीट करण्याची कालमर्यादा आता २ दिवस आणि १२ तास होण्याची शक्यता आहे. जेव्हा पुढील अपडेट मिळेल तेव्हा ही अपडेट दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आणखी काही फिचर्स व्हॉट्सॲपकडून बहाल करण्यात आली आहेत. स्टेटसवर प्रतिक्रिया देण्यासाठी इमोजी रोल आऊट केले आहेत. हे इमोजी यापूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहेत. सहा प्रकारचे इमोजी म्हणजेच लाईक, लव्ह, हसणे, सरप्राईज आणि दु:खी असे ते इमोजी आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button