आजीबाईंनी 99 व्या वर्षी उडवलं इंजिनरहित विमान! | पुढारी

आजीबाईंनी 99 व्या वर्षी उडवलं इंजिनरहित विमान!

लंडन : वयाची चाळीशी ओलांडली तरी अनेकांचे डोळे पैलतीराला लागतात! अशावेळी अतिशय उतारवयातही जीवन उत्साहाने जगणारे लोक प्रेरणादायक ठरतात. अतिशय धाडसी उपक्रम करणारेही अनेक वृद्ध असतात. आता 99 वर्षांच्या एका आजीबाईंनी इंजिन नसलेले विमान उडवून सर्वांनाच थक्‍क केले आहे!

इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये राहणार्‍या केट ऑर्कर्ड या 99 वर्षांच्या आहेत. काही दिवसांमध्येच त्या आपल्या वयाचे शतक गाठतील. इतक्या वयाच्या या आजीबाईंनी जे केलं आहे ते पाहून अवघं जग थक्‍क झालं. त्यांनी युद्धासाठी वापरले जाणारे इंजिनरहित एअरक्राफ्ट उडवून दाखवलं आहे. केट यांनी ब्रिटीश रॉयल एअरफोर्समध्ये सेवा बजावलेली आहे.

अनेकांचे आपल्या व्यवसायावर नितांत प्रेम असतं आणि या आजीबाईंनीही हे प्रेम या वयातही जपून ठेवलं आहे. त्यामुळेच त्यांनी हे विमान उडवलं आणि त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला गेला. या व्हिडीओतून दिसणारा त्यांचा आत्मविश्‍वास लक्ष वेधून जातो. विशेष म्हणजे या आजीबाई अँग्लो-इंडियन कुटुंबात जन्मलेल्या आहेत. त्यांना एकूण 13 भावंडं आहेत. त्या लहान होत्या त्यावेळी त्यांचे भारतीय वडील रेल्वेमध्ये चिफ टेलिग्राफ इन्स्पेक्टर म्हणून काम करीत होते.

व्हीलचेअरच्या साथीने विवेक बघतोय अजिंक्य होण्याची स्वप्नं | Inspirational Story | Para player

Back to top button