WhatsApp : व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरने अनेक अडचणी सुटणार ! | पुढारी

WhatsApp : व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरने अनेक अडचणी सुटणार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲप यूजर्ससाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता व्हॉट्सॲप यूजर्स इन्स्टंट मेसेजिंग ॲपद्वारे 2 GB पर्यंतच्या फाइल्स सहजरित्या व्हॉट्सॲपवरून पाठवता येणार आहेत. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप एका नवीन फीचरची लवकरच चाचणी करणार आहे, ज्याद्वारे मीडिया फाइल्स पाठवण्याची मर्यादा वाढवली जाईल. सध्या या व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही १०० एमबीपर्यंतच्या फाइल्स सहज ट्रान्सफर करू शकता. त्यामुळे टेलिग्रामला तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे.

WABetaInfo च्या अहवालानुसार, नवीन बीटा अपडेट 2.22.8.5, 2.22.8.6 आणि 2.22.8.7 Android आवृत्ती तसेच iOS (2.22.8.5) साठी सुसंगत असेल. याआधी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 100MB पर्यंत फाइल शेअर केली जाऊ शकत होती. 25 MB पर्यंतच्या फाइल्स Gmail द्वारे शेअर केल्या जाऊ शकतात. 1.5 GB च्या मीडिया फाइल्स टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरून शेअर केल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, व्हॉट्सॲप आपल्या प्लॅटफॉर्मवरून 1 GB पर्यंत मीडिया फाइल शेअरचे हे नवीन फिचर देऊन टेलिग्रामला मोठा धक्का देत आहे.

व्हॉट्सॲप करत आहे ही तयारी

मात्र, काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनामध्ये व्हॉट्सॲपद्वारे एक छोटी चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये काही बीटा टेस्टर्सना 2 जीबीपर्यंतच्या फाइल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. WhatsApp च्या iOS वापरकर्त्यांच्या बीटा चाचणीसाठी फीचर सपोर्ट देण्यात आला आहे. वास्तविक, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना टेलिग्रामपेक्षा मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करण्याची सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून अधिकाधिक व्हॉट्सॲप वापरकर्ते जोडले जातील.

हेही वाचलत का ?

Back to top button