जुगार अड्ड्यावर छापा; सोलापुरात दहा जणांवर गुन्हा | पुढारी

जुगार अड्ड्यावर छापा; सोलापुरात दहा जणांवर गुन्हा

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : नवी पेठेतील पंजाबी इमारतीत चालणार्‍या जुगार अड्ड्यावर सोमवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी 10 मोटारसायकली, 11 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 5 लाख 62 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 10 जुगार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चंदन अविनाश पंजाबी (वय 38 रा. गोल्डफिंच पेठ), अरविंद संजय घोडके (वय 30 रा. जम्मा चाळ, भवानी पेठ), अजित मुनीलाल बाफना (वय 38 रा. अरिहंत अपार्टमेंट, सम्राट चौक), अनुप रमेश मंत्री (वय 32 रा. वर्धमान नगर, भवानी पेठ), हर्षल राजेंद्र सारडा (वय 31 रा. वर्धमान नगर), मकरंद बाळकृष्ण खरात (वय 46 रा. रामलाल चौक), शांतीलाल छगनलाल कांकरिया (वय 50 रा. हिरेहब्बू कॉम्प्लेक्स, बाळीवेस), करण अशोक कुकरेजा (वय 42 रा. लक्ष्मी विष्णू सोसायटी, कुमठा नाका), सम्राट प्रकाश माने (वय 32 रा. गुलमोहर अपार्टमेंट, जूना पूना नाका), रवि शंकर शिंगे (रा. शेटेवस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी पोलिस नाईक धनाजी बाबर यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, नवीपेठ येथील लाल बहादुर शास्त्री शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या 13 गोल्ड फिंच पेठ, पंजाबी इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर जुगारअड्डा चालतो अशी माहिती पोलिसांनी मिळाली.

तेंव्हा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी जावून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी अंदर-बाहर नावाचा जुगार खेळणार्‍या वरील 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी पोलिसांनी जुगार खेळणार्‍यांच्या 10 मोटारसायकली, 11 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 5 लाख 62 हजार 360 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यावेळी जुगार खेळणार्‍यांनी मनपा आयुक्तांनी काढलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर न ठेवता इतरांच्या जिवीतास धोका होईल असे कृत्य केले.

या फिर्यादी वरून वरील 10 जणांविरूघ्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास फौजदार सतिश भोईटे हे करीत आहेत.

Back to top button