कोल्हापूर : ग्रामपंचायत इच्छुक उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका

कोल्हापूर : ग्रामपंचायत इच्छुक उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका

अब्दुल लाट : अंकुश पाटील :  सध्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचा निवडणुकांनाचा धुरळा उडणार आहे. उद्या शुक्रवारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. याच दरम्यान इच्छुक उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे.

११ ते ३ यावेळेत उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून प्रिंट काढून व त्यासोबत कागदपत्रांची पूर्तता करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे जमा करणेचे आहे. गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीचे वातवरण तापत आहे. तर इच्छुक उमेदवारांची कागदपतत्रांची जुळवाजुळवं करण्यासाठी धावपळ सुरू आहे. उद्या शुक्रवार (दिनांक २ डिसेंबर) रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. परंतु, जस-जशी अर्ज स्विकारण्याची मुदत संपत येत आहे तसे ऑनलाईन सर्व्हर डाऊनची समस्या अधिक प्रमाणात दिसत आहे.

अनेकांनी रात्री जागून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे अनेकांचे अर्ज अजूनही अपूर्ण आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने आज देखील ऑनलाईनवर प्रचंड ताण वाढत आहे. यामुळे तासन्तास इंटरनेटवर सर्व्हरचा डाऊनची समस्या अधिक दिसत आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवांराकडून निवडणूक आयोगाकडून ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. अन्यथा अशीच समस्या राहिली तर अनेक चांगल्या उमेदवार निवडणूक लढवण्यापासून मुकले तर ग्रामीण भागातील चांगल्या नेतृत्वाला खीळ बसण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news