Sanjay Raut : राज्यपाल व मंत्र्यांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची चढाओढ - संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : राज्यपाल व मंत्र्यांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची चढाओढ - संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमचे 40 खोके गेले असले तरी शिवसेना जागेवरच आहे. जनताही जागेवरच आहे. जनता आमच्या पाठीशी आहे, असे विधान करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

आमचे अनेक लोक महाराष्ट्रभर फिरत आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेची, शिवसेनेच्या नेत्यांची वाट पाहत आहे. आमचे 40 खोके गेले असले तरी शिवसेना जागेवरच आहे. जनताही जागेवरच आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. असं म्हणतं त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते पुढे असेही म्हणाले, बंडखोरीनंतर शिवसेना वाढली आहे आणि वाढतचं राहील, असेही ते म्हणाले.

Sanjay Raut : किमान पर्यटनमंत्र्यांना तरी इतिहास माहित असायला हवा 

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या आग्र्याहून सुटकेशी केली यावरुन महाराष्ट्रात वाद सुरु आहे. यावरुन बोलताना ते म्हणाले, राज्यापल, मंत्री आता हे मंगलप्रभात लोढा यांच्यात जणू काही स्पर्धा लागली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जादा कोण करतोय. पण महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही. त्यांना लवकरत करारी जवाब मिळेल. ते पुढेही असे म्हणाले, हे एक उद्योेजक आहेत, मुंबईचे पालकमंत्री आहेत, पर्यटनमंत्री आहेत. शिवरायांची तुलना बंडखोरांशी कशी करता? किमान राज्याच्या पर्यटनमंत्र्यांना तरी शिवरायांचा इतिहास माहित असायला हवा, असं म्हणतं त्यांनी लोढा यांना टोमणा मारला.

भाजपच्या सुधांशू त्रिवेदी या मंत्र्याने शिवरायांना माफीवीर ठरवलं, राज्यपालांनी शिवरायांना नायकच नाहीत, असं म्हंटल, लोढा यांनी शिवरायांची तुलना बंडखोर आणि बेईमानाशी केली हा महाराष्ट्राचा अपमान जनता सहन करणार नाही. हे सरकार खोके सरकार जे देशात कुख्यात आहे. त्यांच्यात जणू काही स्पर्धा लागली आहे का? शिवरायांचा अपमान करण्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे बक्षीस केंद्र सरकारनं ठेवलं आहे का? छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही तसे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button