Price hike : भाजीपाला, दुधाच्या किमती वाढल्या, कच्चे तेल १०० डॉलरच्या वर राहिल्यास महागाई आणखी वाढेल : आरबीआय

Veg & crude oil Price Hike
Veg & crude oil Price Hike
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भाजीपाला आणि दूध यासारख्या महत्त्वाच्या जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तसेच रशिया-यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. क्रूड ऑईल 100 डॉलरच्या वर राहिल्यास महागाई आणखी  वाढू शकते आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होऊ शकतो, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी (दि.८) पतधोरण समितीच्या बैठकीनंतर सांगितले आहे.

क्रूड ऑईलच्या किंमती प्रति बॅरलच्या बेसलाइनपेक्षा 10 टक्क्यांनी वाढल्या असून, देशांतर्गत चलनवाढ आणखी वाढू शकते. राजधानी दिल्लीत शुक्रवारी लिंबूच्या दरात मोठी वाढ झाली आहे. "100 रुपये प्रति किलो अशी ही वाजवी किंमत आहे, परंतु लिंबूसाठी प्रति किलो 250 रुपये मोजावे लागत आहेत. लिंबूचे दर भाव वाढीमुळे लोक लिंबू खरेदी करण्यास तयार नाहीत. शिवाय, या दराने खरेदी करणे आमच्यासाठीही परवडत नाही," असे मत एका लिंबू विक्रेत्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. गेल्यावर्षी आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रात झालेल्या चक्रीवादळात लिंबूच्या झाडांचे मोठे नुकसान झाल्यामुळे देशाच्या इतर भागांमध्येही लिंबूच्या किमती अवाढव्य वाढल्या आहेत.

सध्या गुजरात आणि दिल्लीत टोमॅटो सुमारे 40 रुपये किलो दराने विकले जात आहे. जे पूर्वी 25-30 रुपये होते. असे वृत्त पीटीआयने दिली आहे. आता दुधीभोपळा 40 रुपये किलोने विकला जात आहे. भाववाढीमुळे बटाटेही महागले असून, सध्या त्याचा भाव 25 रुपये किलो आहे. पूर्वी हेच बटाटे 10 रुपये किलोने विकले जायचे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि नोएडा सारख्या शहरी भागातही भाजीपाला, दुधाच्या किमती वाढल्या आहेत. दुधाचे दरही अलीकडेच वाढले आहेत. अमूल, पराग आणि वेरका या कंपन्यांनी त्यांच्या दुधाच्या किमतीत २ रूपयांनी वाढवल्या आहेत. कारण "विज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, पशुखाद्याचा वाढता खर्च यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे " असे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जयेन मेहता यांनी म्हटले आहे.

2022-23 साठी पहिल्या द्वि-मासिक पतधोरणात, RBI ने म्हटले आहे की, उच्च आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमती आणि उन्नत लॉजिस्टिक यातील व्यत्ययामुळे कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कच्च्या मालाचा खर्च वाढू शकतो. विजेच्या किमतींबाबत, रेटिंग एजन्सी ICRA ने म्हटले आहे की, H1FY2023 साठी अधिसूचित घरगुती गॅसच्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली आहे. वीज निर्मिती प्रकल्प निर्मितीच्या खर्चात पूर्वीच्या किंमतीपेक्षा प्रति युनिट 2 रुपयांपेक्षा जास्तीने वाढ होईल असेही सांगितले जात आहे. महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावरील जागतिक अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे.

RBI ने पॉलिसी स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, "कच्च्या तेलाच्या किमती USD 100 प्रति बॅरलच्या बेसलाइनच्या 10 टक्क्यांच्या वर आहेत असे गृहीत धरल्यास, देशांतर्गत चलनवाढ आणि वाढ अनुक्रमे 20 पॉइंट्स किंवा 30 बेस पॉइंट्सच्या आसपास होऊ शकते. सध्या, बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल USD 101.34 वर आहे. "जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींनी US$ 130 प्रति बॅरल ओलांडले आहे. 2008 नंतर क्रूड प्रति बॅरलचा दर सर्वोच्च पातळीला स्पर्श करूनही चढत्या पातळीवरच अस्थिर राहिला होता.", असे RBI ने सांगितले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज 5.7 टक्क्यांपर्यंत सुधारित केला. जो आधी 4.5 टक्क्यांपर्यंत वर्तवला होता. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, केंद्रीय बँकेने CPI महागाईचा अंदाज वाढवला आहे. कारण फेब्रुवारी अखेरीस वाढलेल्या भौगोलिक-राजकीय तणावाने पूर्वीचे महागाईचे पूर्वअंदाज मागे टाकले आहेत.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news