WhatsApp Upcoming Features 2022 : ‘व्हॉट्सॲप’नं आणले ‘हे’ ६ नवीन फिचर्स, जाणून घ्या काय आहे त्यात खास

 Helpdesk
Helpdesk
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  व्हॉट्सॲप (WhatsApp) मध्ये सातत्याने नवीन बदल होत असतात. यामध्ये युजर्सची मागणी आणि काळाची गरज यानुसार अनेक अपडेट होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये असेच काही बदल दाले असल्याचे व्हॉट्सॲपच्या WABetaInfo या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडियावर सांगण्यात आली आहे. व्हॉट्सॲप हे अॅप (App WhatsApp) आपल्या युजर्ससाठी असेच काही नवनवे फीचर्स बाजारपेठेत आणण्यासाठी टेस्टिंग करत आहे. चला तर पाहूया कोणते आहेत हे भन्नाट फीचर्स.

मेसेज रिअ‍ॅक्शन (Message Reactions)

व्हॉट्सॲपवर (WhatsApp) मध्ये इमोजी रिअॅक्शन हे नव्याने येऊ घातलेले फीचर आहे. यामध्ये आपण इमोजीद्वारे एखाद्याच्या संदेशावर प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकतो. समजा एखाद्याने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या किंवा दुसरा एखादा संदेश पाठवला तर, तुम्हाला शब्द टाईप न करता प्रतिक्रिया द्यायची असेल तर या फीचर अंतर्गत तुम्ही इमोजी वापरून प्रतिक्रिया देऊ शकता.

व्हॉट्सॲपवर ग्लोबल व्हॉईस नोट प्लेयर

व्हॉट्सॲप आणखी एक नवीन फीचर आणले आहे, हे फीचर व्हॉईस मेसेजशी संबंधित आहे. हे फीचर आणल्यानंतर यूजर्स बॅकग्राउंडमध्ये व्हॉट्सॲप चॅट विंडोमध्ये प्ले केलेला व्हॉइस मेसेज देखील ऐकू शकतील असे सांगण्यात येत आहे. युजर्सना व्हॉईस मेसेजच्या खाली पॉज आणि रिझ्युमचा पर्याय दिसेल, जो चॅटच्या बाहेरही उपस्थित असेल. तसेच, वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन अंतर्गत, युजर्सना व्हॉइस मेसेज ऐकण्याचा चांगला अनुभव मिळेल.

नवीन इमोजीचा समावेश

तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता, या युनिकोडमधील नवीनतम समाविष्ट केलेल्या इमोजी आहेत. ज्याचा वापर आपलेला संदेशावर प्रतिक्रिया देण्यासाठी करण्यात येईल. काही इमोजी हे त्वचेसंबंधी रिअॅक्शनला समर्थन देतात. हे सर्व इमोजी फक्त बीटा व्हर्जनसाठीच उपलब्ध आहेत.

संदेशांमधून जाता येणार कॉल आणि सेव्ह नंबरमध्ये

WhatsApp ने संदेशांमध्ये प्राप्त झालेल्या फोन नंबरसाठी नवीन पॉप-अप मेनूची चाचणी सुरू केली आहे. या नवीन फीचर्समध्ये तुम्हाला चॅटमध्ये नंबरवर क्लिक केल्यास डायल करायचा की तुम्हाला तुमच्या संपर्कांमध्ये जोडायचा हे निवडण्याची परवानगी विचारेल.

फॉरवर्ड करण्यावर मर्यादा

व्हॉट्सॲपने संदेश फॉरवर्ड करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. एकापेक्षा जास्त ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंदी घालणार आहे. मेसेजिंग अॅप या फीचरची चाचणी सध्या सुरू आहे. हे फीचर आल्यास अनेक यूजर्सच्या अडचणी वाढतील, जे मेसेज फॉरवर्ड फीचरचा जास्त वापर करतात. तसेच फॉरवर्ड केलेले मेसेज एका वेळी एकापेक्षा जास्त ग्रुप चॅटवर फॉरवर्ड करणे शक्य होणार नाही . या निर्णयामुळे काही प्रमाणात फेक न्यूज किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.

कॅमेरा इंटरफेस देखील होणार अपडेट

व्हॉट्सअॅप आपला कॅमेरा इंटरफेस देखील अपडेट करणार असल्याचे समजत आहे. WhatsApp चे हे कॅमेरा अपडेट फीचर iOS युजर्संसाठी आधीच उपलब्ध होते पण काही युजर्सच्या तक्रारींमुळे ते काही काळासाठी थांबवण्यात आले होते. आता कंपनी हे फीचर अँड्रॉईड यूजर्ससाठीही सादर करणार आहे. हे अपडेट युजर्सना फोटो किंवा व्हीडीओ सिलेक्ट करताना एक नवीन डिझाईन दिसत आहे. त्याचवेळी स्क्रीनच्या बाजूला कॅमेराचा मीडिया बारही दिसतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news