पुढारी ऑनलाईन डेस्क : आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सॅमसंगचा Samsung Galaxy M33 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत येत आहे. याच्या आगमनाने अनेकांचे मोबाईल चार्जिंगचे टेंशन मिटणार आहे. कारण, यामध्ये मजबूत बॅटरीसह Galaxy M33 5G आहे. आजपासून हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. चला तर या स्मार्टफोनची संभाव्य किंमत, वैशिष्ट्ये आणि तपशील जाणून घेऊया.
टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मते, Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनचे दोन प्रकार लाँच करेल. यामध्ये 6GB + 128GB व्हेरिएंट आणि 8GB + 128GB व्हेरिएंट असे दोन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीच्या 6GB व्हर्जनची किंमत 21,999 रुपये आहे, तर 8GB व्हर्जनची किंमत 23,999 रुपये आहे. टिपस्टरने पुढे खुलासा केला की, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत पुढील आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy M33 5G यामध्ये निळा, तपकिरी आणि हिरवा अशा तीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनला 6.6-इंचाचा TFT FHD+ (1080 x 2408) LCD डिस्प्ले आहे. खास फोटोग्राफीसाठी सॅमसंगने मागील बाजूस 50MP f/1.8 प्राथमिक कॅमेरा, 5MP f/2.2 अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP f/2.4 डेप्थ सेन्सर आणि 2MP f/2.2 सह क्वाड-कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट केला आहे. खास सेल्फीसाठी यामध्ये 8MP f/2.2 स्नॅपर मिळतो. यामध्ये अंतर्गत स्टोरेज 128GB आहे. मात्र, मायक्रो-एसडी कार्डने ते 1TB पर्यंत वाढवता येते. या डिव्हाइसमध्ये एक्सलेरोमीटर, फिंगरप्रिंट सेन्सर, गायरो सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, व्हर्च्युअल लाइट सेन्सर, व्हर्च्युअल आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आदी फीचर्स उपलब्ध आहेत.