विनोद पवार, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेलेला मंडणगड येथील आकाश कोबनाक युद्धजन्य स्थितीत अडकला. आम्हाला भारत सरकारने लवकरात लवकर येथून भारतात परत आणावे अशी विनंती करणाऱ्या आकाश सोबत दैनिक 'पुढारी'ने साधला संवाद साधला आहे. हॅलो मी आकाश कोबनाक… सर मी युक्रेन मध्ये अडकलोय हो… आमच्या टेर्नोपिल शहरामध्ये आता बॉम्ब स्फोटाचे आवाज येत आहेत, येथील लष्कराने रेड अलर्ट जारी केला आहे.
परिस्थिती अत्यंत कठीण आहे. माझ्याबरोबर माझे मित्रही येथे अडकले आहेत, तरी लवकरात लवकर विमान पाठवावे आणि माझ्याबरोबर अनेक भारतीयांना या युद्धातून वाचवा. ही आर्त हाक दिली आहे. ही हाक मंडनगडच्या आकाश कोबनाकची आहे. त्याने दैनिक 'पुढारी' प्रतिनिधीशी थेट मोबाईल संवाद केला. त्या संवादामध्ये त्याने ही विनंती केली आहे.
युक्रेन देशात सद्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत काही भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आकाश अनंत कोबनाक या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आकाश हा वैद्यकीय शिक्षण युक्रेन येथे घेत आहे. सद्या तो एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.
आकाश कोबनाक हा टेर्नोपिल राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाच्या वसतीगृहात राहतो आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण भारताच्या तुलनेत कमी खर्चात पूर्ण होते. येथील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा मात्र उच्च असल्याने भारतासह युरोपात या शिक्षणाला मान्यता देण्यात येते. त्यामुळे भारतातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जात असतात. मंडणगड तालुक्यातील पंदेरी येथील मूळ रहिवाशी आणि सध्या भिंगळोली येथे स्थायिक असलेल्या आकाश याने युक्रेनला जाण्याचा निर्णय घेतला.
आकाशचे वडील अनंत कोबनाक हे भोळवली जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत, त्यांनी आपल्या मुलांबाबत तातडीने जिल्हा अधिकारी कार्यालयाला कळवले. त्याची माहिती मंडणगड तहसीलमध्येदिली आहे, या निवेदनात युरेन मध्ये युद्ध जन्य परिस्थितीत अडकलेल्या आकाश ला भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित आवश्यक उपाय योजना करावी अशी विनंती अनंत कोबनाक यांनी केली आहे.
रशियाने युक्रेनची सीमा ओलांडत पूर्वेकडील प्रदेशाला स्वतंत्र करण्याचे स्वतःचे धोरण स्थापन केले. त्यासाठी आम्ही शांती निर्माण करण्यासाठी युक्रेन मध्ये घुसत आहोत असे रशियाने जाहीर केले आहे. सुरुवातीच्या युद्धजन्य सावट निर्माण होण्याच्या काळात सामान्य लोकवस्थितील नागरिक व परदेशी लोकांना या आक्रमणाची फारशी भीती वाटत नव्हती, विशेष म्हणजे काही भारतीय विद्यार्थ्यांना आपल्याला परत मायदेशी जायचे आहे का याविषयी भारतीय दूतवासामध्ये चौकशी केली असता तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला जाता येईल. असे सांगितले.
त्यानुसार अनेक विद्यार्थी रशियाच्या या लष्करी अतिक्रमाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यास शशांक होते. विशेष म्हणजे परदेशी जाणाऱ्या लोकांचे प्रवास भाडे महागल्याने भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचा प्रवास महाग झाला होता. सुदैवाने आकाश याला मात्र विमान प्रवासाचे तिकीट मिळवण्यात यश आले. त्यामुळे तो लवकरच भारतात परतणार होता. पण रशियाने लष्करी अतिक्रमणाचा वेग वाढवत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेतली आणि तिकडचे विमानतळ सील केले. तेथून जवळच असलेल्या टेर्नोपिल येथे राहत असलेल्या आकाशची मायदेशी परतण्याची सर्व मार्ग बंद झाले.
हे ही वाचा