पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने नवाब मलिक रुग्णालयात | पुढारी

पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने नवाब मलिक रुग्णालयात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ईडीने मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्‍यानंतर त्‍यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाकडून मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्‍यान मलिक यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्‍याने त्‍यांना जे.जे. रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच, ईडीच्या आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी सकाळी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्‍यानंतर त्‍याची चौकशी केली. त्‍यांना कोर्टाने ईडी कोठड सुनावली आहे. यामुळे राज्‍याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल देखमुख यांचेनंतर दुसरे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्‍का बसला आहे.

का केली अटक ? 

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते.  दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक ईक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्‍या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.

हे ही वाचा 

Back to top button