नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मंडावली तुरुंगामध्ये घेण्यात आलेल्या झडतीत ११७ मोबाईल फोन सापडले. या प्रकरणी पाच तुरुंग कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, त्यात दोन उपअधीक्षक, एक सहाय्यक अधीक्षक, एक मुख्य वॉर्डन आणि वॉर्डनचा समावेश आहे.
मंडावली तुरुंगात कैद्यांकडून मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर केला जात असल्याची माहिती तुरुंग विभागाच्या महासंचालकांना मिळाली होती. यासंदर्भात महासंचालकांनी तुरुंग अधीक्षकांना तपास पथक स्थापन करुन कैद्यांची झडती घेण्याचे निर्देश दिले होते. झडतीमध्ये कैद्यांकडे तब्बल ११७ मोबाईल फोन आढळून आले. यानंतर कैद्यांना मोबाईल पुरविणाऱ्या उपअधीक्षक प्रदीप शर्मा, धर्मेंद्र मौर्य, सहाय्यक अधीक्षक सन्नी चंद्रा, प्रमुख वॉर्डन लोकेश धामा आणि वॉर्डन हंसराज मीना यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या डिसेंबर महिन्यातही कैद्यांकडून आठ मोबाईल जप्त करण्यात आले होते.
हेही वाचा :