पुढारी ऑनलाईन डेस्क : Russia Ukraine War : जवळपास 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गुरुवारी (दि.५) युक्रेनमध्ये ६ ते ७ जानेवारी दरम्यान युद्धविराम करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच या काळात युद्ध थांबवले जाईल. रशियाचे ऑर्थोडॉक्स बिशप 76 वर्षीय पॅट्रिआर्क किरिल यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 6-7 जानेवारी रोजी युक्रेनमध्ये युद्धविराम करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
Russia Ukraine War : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्धाला सुरू केल्यानंतर रशियाने युक्रेनमध्ये पूर्ण युद्धविराम आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियाचे 76 वर्षीय ऑर्थोडॉक्स बिशप पॅट्रिआर्क किरिल यांच्या धार्मिक सुट्टीदरम्यान युद्धबंदीच्या विनंतीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
Russia Ukraine War : क्रेमलिन यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे, " मी रशियन फेडरेशनच्या संरक्षण मंत्र्यांना 6 जानेवारी 2023 रोजी रात्री 12:00 (0900 GMT) पासून 7 जानेवारी 2023 रोजी 24:00 (2100 GMT) पर्यंत दोन्ही बाजूंमधील संपूर्ण संपर्क रेषेसह युद्धविराम करण्याची सूचना देतो."
हेही वाचा