Hearing Loss : हेडफोन, कर्कश आवाजामुळे जगभरातील १ अब्‍ज तरुणांना बहिरेपणाचा धोका : नवीन संशोधनातील धक्‍कादायक माहिती

Hearing Loss : हेडफोन, कर्कश आवाजामुळे जगभरातील १ अब्‍ज तरुणांना बहिरेपणाचा धोका : नवीन संशोधनातील धक्‍कादायक माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हेडफोन आणि कर्कश आवाजातील कार्यक्रमांमुळे जगभरातील सुमारे एक अब्‍ज तरुणांना बहिरेपणाचा धोका ( Hearing Loss ) असल्‍याचा निष्‍कर्ष नवीन अभ्‍यासात नोंदविण्‍यात आला आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या (डब्‍ल्‍यूएचओ ) नेत्तृत्‍वाखालील अभ्‍यासातील निष्‍कर्ष बीएमजे ग्‍लोबल हेल्‍थ या जर्नलमध्‍ये प्रकाशित झाले आहेत.  या अभ्‍यासात गेल्‍या २० वर्षांमध्‍ये इंग्रजी, स्‍पॅनिश, फ्रेंच आणि रशियन भाषेमध्‍ये झालेल्‍या ३३ संशोधनातील माहितीचा विचार करण्‍यात आला आहे.

या अभ्‍यासात असं आढळलं की, जगभरातील २४ टक्‍के तरुणांमध्‍ये मोबाईल फोनह हेडफोन वापरताना त्‍यांच्‍या ऐकण्‍याच्‍या पद्धती ही श्रवणसंस्‍थेसाठी हानीकारण होत्‍या.४८ टक्‍के तरुण जे मनोरंजनाच्‍या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक आवाजाच्‍या संपर्कात आले होते. सर्व अभ्‍यासा एकत्र केले तर जगभरात ६ लाख ७० हजार ते १.३५ अब्‍ज तरुणांना हेडफोन आणि गोंगाटाच्‍या संपर्कात आल्‍यामुळे श्रवणशक्‍ती बाबत धोका असल्‍याचे स्‍पष्‍ट झले.

आवाजाच्‍या तीव्रतेवर हवे लक्ष

या अभ्‍यासाबाबत दक्षिण कॅरोलिना मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ऑडिओलॉजिस्ट लॉरेन डिलार्ड यांनी म्‍हटले आहे की, "हेडफोन्सवरून ऐकू येण्याचा धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आवाज कमी ठेवणे आणि हेडफोनचा वापर कमी करणे हा आहे, पण अलिकडे लोकांना खूप मोठ्या आवाजात संगीत आवडते. मात्र बहिरेपणाचा त्रास होवू नयेसाठी तरुणाी हेडफोन वापरताना आवाजाची पातळी तपासणीसाठी स्‍मार्टफोनवरील ॲपचा वापर करावा "

Hearing Loss :  उतारवयात होतो परिणाम

हेडफोन आणि गोंगाटाच्‍या ठिकाणी तुम्‍ही सातत्‍याने वापर करत असता तर उत्तारवयात याचा मोठा परिणाम होवू शकतो. सर्वच देशातील सरकारने आवाजाच्‍या पातळीबाबत डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहनही डिलार्ड यांनी केले आहे.  डब्ल्यूएचओ'च्‍या माहितीनुसार,. जगातील एकूण लोकसंख्‍येच्‍या पाच टक्‍क्‍यांहून अधिक लोकांची श्रवणशक्‍तीवर परिणाम झाली आहे. जगभरात २०५० पर्यंत ही लोकसंठ्‍या 700 दशलक्षांपर्यंत वाढेल.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news