VVS Laxman : मुख्‍य प्रशिक्षक लक्ष्‍मण यांनी टीम इंडियाला दिला यशाचा मंत्र, “निर्भिडपणे बॅटिंगबरोबर…” | पुढारी

VVS Laxman : मुख्‍य प्रशिक्षक लक्ष्‍मण यांनी टीम इंडियाला दिला यशाचा मंत्र, "निर्भिडपणे बॅटिंगबरोबर..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि न्‍यूझीलंड यांच्‍यातील टी-२० मालिकेस शुक्रवार ( दि. १८ ) पासून प्रारंभ होत आहे. वेंलिग्‍टन येथील शुक्रवारी पहिला सामना होईल. यापूर्वी टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मण ( VVS Laxman )   यांनी टीम इंडियाला यशाचा मंत्र दिला आहे.

टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्‍टाफला आराम देण्‍यात आला आहे. न्‍यूझीलंड दौर्‍यासाठॅ प्रशिक्षक पदाची धुरा व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मण यांच्‍यावर सोपविण्‍यात आली आहे. .या दौर्‍यासाठी टीम इंडियातील वरिष्‍ठ खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा यांना विश्रांती देण्‍यात आली आहे. सर्व वरिष्‍ठ खेळाडू बांगलादेश दौर्‍यात सहभागी होणार आहेत.

भारत आणि न्‍यूझीलंड यांच्‍यात टी-२० मालिकते तीन सामने होतील. तर वन डे मालिकेतही तीन दिन होतील. टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्त्‍व हार्दिक पंड्या करणार आहे. तर वन डे मालिकेसाठी शिखर धवनकडे संघाचे नेतृत्त्‍व आहे.

VVS Laxman : … तर विजय निश्‍चित

न्‍यूझीलंड टी-२० मालिकेपूर्वी लक्ष्‍मण म्‍हणाले की, टी-२० फॉर्मेटमध्‍ये निर्भिडपणे बॅटिंग करावी लागते. त्‍याचबरोबर परिस्‍थितीचाही विचार करुन तुम्‍हाला निर्णय घ्‍यावा लागतो. संघाच्‍या गरजानुसार तुम्‍हाला खेळ करावा लागतो. या फॉर्मेटमध्‍ये क्रिकेटपटूंचा विचार स्‍पष्‍ट असावा लागतो. त्‍याला स्‍वत:ला आपली कामगिरी तत्‍काळ दाखवावी लागते. हा विचार करुन खेळाडू मैदानात उतरले तर विजय निश्‍चित असतो.

हेही वाचा : 

 

 

Back to top button