Prasad Oak : वयाच्या ४७ व्या वर्षीही फिट आहे प्रसाद ओक

prasad and manjiri oak
prasad and manjiri oak
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak ) सध्या चर्चा सुरु आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटात आनंद दिघे यांच्या भूमिकेत तो झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्रसाद वयाच्या ४७ व्या वर्षीही फिट आहे. या अष्टपैलू अभिनेत्याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचसोबत त्याची जोडीदार मंजिरी ओकदेखील दिसायला खूप सुंदर आहे. जाणून घेऊया या गोड कपलविषयी. (Prasad Oak )

१७ फेब्रुवारी, १९७२ रोजी पुणे येथे जन्मलेल्या प्रसादने त्याच्या अभिनयकौशल्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. प्रत्येक भूमिकेत तो परपेक्ट बसणारा अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. केवळ अभिनेताच नव्हे तर खलनायकाची भूमिका त्याने लिलया पार पाडलेली आहे. 'अवघाची हा संसार' यांसारखी मालिका आणि '7, रोशन व्हिला' यांसारख्या चित्रपटातून त्याने त्याचे खलनायिकीचे रुप दाखवले आहे.

बालपणापासूनच अभिनयाची आवड

प्रसादने त्याते शालेय शिक्षण भावे हायस्कूल पुणे येथून पूर्ण केले. पुढे बीएमसीसी कॉलेजमधून पदवी घेतली. प्रसादला लहानपणपासूनच अभिनयाची आवड होती. सुरूवातीला छोट्या-मोठ्या भूमिका साकारत त्याने प्रसिध्द अभिनेत्यापर्यंतची मजल मारलीय.

लेखक, दिग्दर्शकही

कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल की, प्रसाद अभिनयासोबतच लेखक, दिग्दर्शक, गायक, कवी आणि सूत्रसंचालकही आहे. तो उत्तमरित्या सूत्रसंचालन करतो. त्याने आतापर्यंत ऐंशीहून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने 'हिरकणी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती.

मंजिरी ओक – प्रसाद ओक
मंजिरी ओक – प्रसाद ओक

वयाच्या ४७ व्या वर्षीही फिटनेस

प्रसादकडे पाहिल्यावर कोणालाही विश्वास करणार नाही की, तो ४७ वर्षांचा आहे. डाएट आणि व्यायाम हे त्याच्या फिटनेस रहस्य आहे.
प्रसादची पत्नी मंजिरी ओकदेखील खूप सुंदर आहे. प्रसादने मंजिरीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मंजिरी ओक
मंजिरी ओक

 

View this post on Instagram

 

A post shared by manjiri oak (@manjiri_oak)

 

View this post on Instagram

 

A post shared by manjiri oak (@manjiri_oak)

 

View this post on Instagram

 

A post shared by manjiri oak (@manjiri_oak)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news