करिना खूपच विनोदी : कुणाल | पुढारी

करिना खूपच विनोदी : कुणाल

पुढारी ऑनलाईन

बर्‍याच वेळा पडद्यावरील भूमिका आणि कलाकाराचा वास्तवातील स्वभाव यामध्ये जमीन-आस्मानचा फरक असतो. मात्र, ‘जब वुई मेट’ मधील दिलखुलास ‘गीत’ ही खर्‍या आयुष्यातील करिनाच्या बरीच जवळ जाणारी आहे. करिनाची नणंद सोहा अली खान हिचा नवरा, अभिनेता कुणाल खेमू याने तिच्या स्वभावाचे काही कंगोरे एका मुलाखतीत उघड केले. त्याने सांगितले, मी आणि सोहा ज्यावेळी सासूरवाडीत जातो, त्यावेळी तिथे जेवणं माझ्यासाठी नेहमीच कठीण जातं. याचं कारण म्हणजे सैफ आणि करिना इतकी मौजमस्ती करीत असतात की हसून हसूनच पोट भरतं. माझ्या सासूरवाडीत डिनर टेबल हे एखाद्या कॉमेडी शोच्या मंचापेक्षा कमी नसते. विशेषतः सैफ आणि करिना ज्यावेळी आमच्यासमवेत डिनरला हजर असतात त्यावेळी तिथे खूपच मस्ती, मस्करी होते. करिना खूपच विनोदी स्वभावाची व्यक्‍ती आहे. ती इतके विनोद आणि मस्करी करीत असते की जेवण करणं खरोखरच कठीण होऊन बसतं. डिनर टेबल एखाद्या लाफ्टर क्लबसारखे होते!

Back to top button