Alia-Ranbir Wedding : आली समीप लग्‍न घटिका….

Alia-Ranbir Wedding : आली समीप लग्‍न घटिका….
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह १४ आणि १५ एप्रिल २०२२ रोजी संपन्न होत आहे. या विवाहासाठी आर के स्‍टुडिओसह यांच्या बंगल्यांना आकर्षक सजावट केली जात आहे.  नुकतेच दोघांच्या मेहंदी सेरेमनीची कार्यक्रम पार पडल्याचे वृत्त समोर आले आहे. आलिया -रणबीरच्या (Alia Ranbir Wedding ) लग्नाच्या जोरदार तयारीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया' या गाण्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे.

मुंबईतील पाली हिल येथील वास्‍तू अपार्टमेंटमध्ये आलियाचा मेहंदी सेरेमनी सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, करिश्मा कपूर, करण जोहर, राहुल भट्ट, अनीषा जैन आणि 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे निर्देशक अयान मुखर्जी यांच्यासह अनेक पाहुणे वास्तू अपार्टमेंटमध्ये पोहोचले आहेत. मुंबईतील आरके स्टुडिओ आकर्षक दिव्यांनी सजला आहे. दोन्ही कुटुबियांकडून लग्नाची अधिकृत घोषणा केली गेली नाही; परंतु, आलियाच्या सावत्र भाऊ राहुल भट्ट याने आलियाच्या लग्नाची तारिख पुढे ढकलल्याचे सांगितले होते.

याच दरम्यान सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या (Alia Ranbir Wedding ) लग्नाच्या तयारीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. यातील एका व्हिडिओत आर के स्टुडिओच्या बाहेर एका चाहत्याने भलेमोठे लग्नाचे गिफ्ट आणलेले पाहायला मिळत आहे. तर आलिया आणि रणबीरच्या बंगल्यावर लायटिंगची झगमगटात पाहायला मिळत आहे. याशिवाय आलियाचा ड्रायव्हर ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. रणबीरच्या बंगल्याबाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील दिसत आहे. यावेळी हिंदी आणि पंजाबी गाण्यांसोबत लोककला आणि शास्त्रीय गाणी वाजवली जात आहेत. 'Mera Laung Gavacha' या गाण्याने मेहंदीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाचा मेकअप Mickey Contractor हे करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या कार्यक्रमाला आणखी काही बॉलिवूड स्टार्स हजेरी लावत आहेत. शेअर होत असलेल्या आणखी एका व्हिडिओ जेवणाच्या मोठ्या भाड्याचा टेम्‍पाे बंगल्याच्या आतमध्ये जाताना दिसत आहे. या सगळ्यावरून आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचे समजते. याच दरम्यान निर्देशक अयान मुखर्जी यांनी आलिया- रणबीरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील "केसरिया तेरा इश्क है पिया' या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अयानने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "रणबीर आणि आलिया याच्या पवित्र नात्यासाठी. जे दोघे लवकरच सुरू करणार आहेत. रणबीर आणि आलिया माझ्या सर्वात जवळच्या आणि प्रिय व्यक्तींपैकी एक आहेत, या दोघांनीही खूप चांगले अनुभव दिले आहेत, त्यांनी आमच्या या चित्रपटासाठी स्वतःचा पूर्णपणे वेळ दिला आहे. त्यांच्या बंधाची एक छोटीशी झलक आम्ही तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो, ही आमच्या 'केसरीया' गाण्याची एक झलक आहे. रणबीर-आलियाच्या या सेलिब्रेशनसाठी आहे, या कपलचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आणि प्रार्थना, त्यांच्या जीवन नव्याने सुरू करतील, ते नेहमी एकत्रीत राहू दे. #loveisthelight'. असे म्हटले आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रणबीर आणि आलिया १४-१५ एप्रिलला लग्न करणार आहेत. तर १७ एप्रिल रोजी लग्नाची रिसेप्शन पार्टी करणार आहेत.

( video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news