

ठाणे : स्नेहा जाधव
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याची विकेट पडली असून त्याने ठाण्याच्या मिताली पारुळकर सोबतचे साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (mitali parulkar and shardul thakur)
मिताली ही मूळची कोल्हापूरची असून ती सध्या ठाण्यात राहत आहे. सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परिसरात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिताली सध्या 'ऑल द बेक्स' नावाची कंपनी चालवते. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात त्यांच्या जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी अशा मोजक्याच लोकांचा सहभाग होता अशी माहिती सूत्रांनी दिली. (mitali parulkar and shardul thakur)
शार्दुल पालघरला राहत असून अनेक वेळा ट्रेनमधून प्रवास करताना त्याला मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हृदयाजवळ असणारा आणि अतिशय सामान्य कुटुंबातला शार्दुल ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 नंतर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याच्या चाहत्याना त्याच्या लग्नातील पेहराव आणि उपस्थिती बद्दल उत्सुकता लागली आहे. (mitali parulkar and shardul thakur)