इजिप्त : ४५०० वर्षं जुने सूर्य मंदिर सापडले (Egypt Sun Temple) | पुढारी

इजिप्त : ४५०० वर्षं जुने सूर्य मंदिर सापडले (Egypt Sun Temple)

प्राचीन इजिप्त मधील सहा प्राचीन मंदिरांपैकी एक

पुढारी ऑनलाईन : इजिप्त या देशाची ओळख तिथल्या प्राचीन संस्कृतीमुळे जगभर आहे. प्राचीन काळात उभारलेले पिरॅमिड इतर मंदिरं या देशाला गूढ बनवतात. काही दिवसांपूर्वी इजिप्तमध्ये प्राचीन सूर्य मंदिर मिळालेलं आहे. या मंदिराच्या आवशेषांचा अभ्यास सुरू आहे.

ऐतिहासिक साधनात प्राचीन काळात इजिप्तमध्ये ६ सूर्य मंदिरं असल्याचे संदर्भ आहेत. पण संशोधकांना आतापर्यंत फक्त २ मंदिरांची आवशेष शोधता आली आहेत.

कैरोपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अबू घुराब या ठिकाणी उत्खनानात हे आवशेष मिळाले आहेत.
पोलिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस इन्स्टिट्यूट ऑफ मीडटेरानियन आणि कल्चरर्स ही संस्था हे उत्खनन करत आहे.

या आवेशषांचा कालखंड इसवीसन पूर्व २५०० इतका आहे. म्हणजे आजपासून जवळपास साडे चार हजार वर्षांपूर्वी हे मंदिर अस्तित्वात होते.

इजिप्त सूर्य मंदिर Pudhari Online
इजिप्तमधील सूर्य मंदिराचे आवशेष

१८९८ला संशोधकांनी न्युसेरा या राजाने बांधलेल्या सूर्य मंदिराच्या आवेशषांचा शोध लावला होता. नव्या संशोधनानुसार हे मंदिर यापूर्वी अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या सूर्य मंदिराच्या आवशेषांवर या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. म्हणजे न्यूसेराने मंदिर बांधण्यापूर्वी एक मंदिर अस्तित्वात होते.

इजिप्त सूर्य मंदिर – शिलालेखही मिळाला

न्युसेरापूर्वी सत्तेत असलेल्या राजांची नावे असलेला एक शिलालेखही मिळाला आहे.

काही भांडी ही मिळालेली आहेत. मूळ मंदिर हे पूर्ण मातीत साकारले होते आणि मोठे होते, असं संशोधकांनी म्हटले आहे.
न्युसेरा या राजाने धार्मिक विधींकरून मूळ मंदिर पाडले आणि त्याच ठिकाणी नवे मंदिर बांधले, असं संशोधकांनी म्हटले आहे.

हेही वाचलं का?

हा व्हिडिओ पाहिला का? – कोल्हापुरात मिळाले अश्मयुगीन मानवाची शस्त्रास्त्रे

Back to top button