

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरमध्ये आजही मोठ्या प्रमाणात दहशतवाद असून यामुळे काश्मिरी पंडितांकडून पुन्हा स्थलांतराचा विचार होत आहे. याबद्दल केंद्र सरकार कधी पाऊल उचलणार? असा सवाल आज (दि. २) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे केला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे केंद्र सरकार हे नागरिकांच्या रक्षणाव्यतिरिक्त निवडणुका आणि राजकारण यामध्येच गुंतलेले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
जीएसटी परताव्यावरून बोलताना राऊत म्हणाले, राज्याला सध्या फंडाची गरज असून महाराष्ट्राची देणी केंद्र सरकारने वेळीच देणे गरजेचे आहे. सध्या भाजप प्रवेशामुळे चर्चेत असलेल्या हार्दिक पटेलांनी स्वतःच्या व्याख्या आधी तपासून घ्याव्यात असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.
हे ही वाचा….