कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या राजीनामा देण्याच्या वृत्ताबाबत नेते म्हणाले…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या राजीनामा देण्याच्या वृत्ताबाबत नेते म्हणाले…
Published on
Updated on

बेंगलोर, पुढारी ऑनलाईन : बी.एस. येडियुरप्पा यांना हटवून मुख्यमंत्रिपदी बसविलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचाही राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हावेरी जिल्ह्यातील शिवगाव या मतदारसंघात बोलताना 'पद, प्रतिष्ठा कायम राहत नाही' असे सूचक विधान त्‍यांनी भावूक होत केले हाेते. यावरून ते लवकरच राजीनामा देतील, अशी चर्चा कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात सुरु झाली हाेती.

कर्नाटकात कुठलेही परिवर्तन होणार नाही. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कलित यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. २०२३ पर्यंत बोम्मईच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जातील, असे स्पष्ट केले.

कतिल यांनी बेंगलोरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, २०२३ मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपर्यंत बोम्मईच मुख्यमंत्री राहतील. सध्या ज्या नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू आहे हा एक राजकीय कट आहे. बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना तत्काळ हटविण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्रपुढे दोन वर्षे ते मुख्यमंत्री होते.

अफवांमागे काँग्रेसचा हात

कतिल यांच्या म्हणण्यानुसार, बोम्मई यांना हटविण्याच्या चर्चा काल्पनिक आहेत. अशा अफवा पसरवून राज्यात राजकीय भ्रम निर्माण करायचा आणि भाजप सरकारला बदनाम करायचे काम सुरू आहे. या अफवा पसरवण्यामागे काँग्रेसचा हात आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.
सीएम बोम्मई आपल्या पायावर उपचार करून घेण्यासाठी परदेशात जाणार असल्याचेही वृत्त पसरले होते. मात्र, कतिल यांच्या म्हणण्यानुसार, सीम बोम्मई यांची तब्येत चांगली आहे. त्यावर उपचार सुरू असून त्यासाठी ते परदेशात जाणार नाहीत. बोम्मई यांनी उपचारासाठी परदेशात जावे, असा सरकारचा प्रस्ताव होता मात्र, नंतर तो मागे घेतला आहे.

सरकारच चांगले काम करत आहे: प्रल्हाद जोशी

हुबळीत पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, २०२३ पर्यंत बसवराज बोम्मईच मुख्यमंत्री राहतील. सरकार चांगले काम करत आहे. जनतेत सरकारविषयी चांगल्या भावना आहेत. राज्यात नेतृत्वबदलाचा कुठलाच विचार नाही.

बोम्मई झाले होते भावूक

मुख्यमंत्री बोम्मई पाच महिन्यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण करतील. काही दिवसांपूर्वी हावेरी जिल्ह्यातील आपला मतदारसंघ शिगगाव येथे बोलताना ते भावून झाले. यावेळी बोाना ते म्हणाले, पद आणि प्रतिष्ठा कायम राहत नाही. बोम्मई यांच्या बोलण्यावरून लवकरच ते राजीनामा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली हाेती.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news