

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राक्षसी महत्त्वकांक्षाची आपल्याला जवळून कल्पना आहे, यामुळेच मी बोलू शकतो. मातोश्रीवर देखील त्यांनी याच पद्धतीने इतरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. केवळ आपणच मोठे हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असून जाहिरातींवर दोन दिवसात कोट्यावधी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. मंगळवारी (दि. १३) विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ते नागपूरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Jitendra Awhad)
ते म्हणाले की, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी बोट धरून, मनाचा मोठेपणा दाखवित त्यांना मुख्यमंत्री केले त्याच फडणवीस यांची अशी प्रतारणा करणे बरोबर नाही असेही स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तार तसेच मंत्रिमंडळातून कुणालाही डच्चू दिला जाणार नाही. 40 आमदारांना सांभाळतानाच त्यांची शक्ती खर्च होत आहे याकडे लक्ष वेधले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार नव्या नियुक्तीनंतर नाराज नाहीत. त्यांची गरज महाराष्ट्राला आहे आणि महाराष्ट्रातच त्यांना रस आहे ते आपल्या जबाबदारीला योग्य रीतीने न्याय देत आहेत. (Jitendra Awhad)
दिल्लीतील कार्यक्रमात देखील ते माझ्यासोबत होते त्यांची कुठलीही नाराजी नाही असा दावा आव्हाड यांनी केला. नागपुरात 44 एकर जागा कवडीमोल अशी दीड कोटीत मुंबईतील एका कंपनीला दिली. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार होण्यापेक्षा त्यांना या प्रकल्पात रस दिसतो, मी 5 कोटीत घेण्यास तयार आहे. आपण आंदोलकांची भेट घेतल्याचे सांगितले.
दरम्यान,त्यांनी माध्यमांशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाख मोलाचा सबुरीचा सल्ला दिला. राज ठाकरे यांनी कृतीशील कार्य करावे, फक्त लोकांच्या नकला व टोमणे मारणे कमी करावे, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
हेही वाचा