Jairam Ramesh : 19 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालणार फक्त नारी शक्ती; हे आहे कारण

Jairam Ramesh
Jairam Ramesh
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : 19 नोव्हेंबरला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत फक्त महिलांचा समावेश असणार आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस, संपर्क प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार डॉ. जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी माहिती दिली आहे. जाणून घ्या. भारत जोडो यात्रेत फक्त महिलाच का असणार आहेत.
Jairam Ramesh
Jairam Ramesh
जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांची 19 नोव्हेंबरला १०५ वी जयंती आहे. त्यानिमित्त भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस खासदार, आमदार, कार्यकर्त्या महिला, पंचायत सदस्य महिला यात सहभागी असणार. ही महिला शक्ती दाखवण्याची एक संधी आहे. संपूर्ण दिवस महिला राहुल गांधींसोबत चालतील, असे काँग्रेसचे सरचिटणीस, संपर्क प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार डॉ. जयराम रमेश, यांनी माहिती दिली आहे. भारत जोडो यात्रेच्या अधिकृत वेळापत्रकानुसार 19 नोव्हेंबर रोजी ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ, जळगाव जामोद येथे समाप्त होईल. १९ नोव्हेंबरनंतर भारत जोडो यात्रा २० नोव्हेंबरला मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

Jairam Ramesh : १९ नोव्हेंबर का आहे खास कॉंग्रेससाठी

१९ नोव्हेंबर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आजी, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस. महिला  सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत फक्त महिलांसोबत चालण्याची परवानगी दिली आहे.
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी 31 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या आजी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली होती. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते की ते "देशासाठी केलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. "
भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या टप्प्यात आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी यात्रेने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भागतून आली आहे. राहुल गांधी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील 15 विधानसभा आणि 6 संसदीय मतदारसंघातून प्रवास करत आहेत आणि मध्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी राज्यातील यात्रा 382 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news