कोल्हापूर : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना सचिन चव्हाण यांनी बांधला फेटा | पुढारी

कोल्हापूर : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना सचिन चव्हाण यांनी बांधला फेटा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रातून जात आहे. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या यात्रेत शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. कोल्हापूरकरांच्या वतीने स्वागत करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी राहुल गांधी यांना फेटा बांधला.

छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा, समतेच्या आणि मानाचा कोल्हापुरी फेटा आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देश समतेच्या विचाराने एकसंध बांधण्यास निघालेल्या गांधी यांना फेटा बांधण्याचा मान चव्हाण यांना मिळाला. छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा भेट दिल्यानंतर गांधी यांनी शाहू महाराज यांना अभिवादन करून स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील उपस्थित होते.

Back to top button