Israel-Hamas conflict : इस्रायल-हमास संघर्ष, मृतांचा आकडा ६१० हून अधिक

Israel-Hamas conflict : इस्रायल-हमास संघर्ष, मृतांचा आकडा ६१० हून अधिक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टाईन दहशतवादी गट हमासने शनिवारी सकाळी सुरू केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ६१० हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर ३००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Israel-Hamas conflict)

संबंधित बातम्या :

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला केला. इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले आहे. गाझा पट्टीवर हवाई दलाकडून सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. इस्रायलने पॅलेस्टाईनविरुद्ध ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले आहे. नेतन्याहू यांनी हमासला त्यांची सर्व ठिकाणं नष्ट करण्याचा इशारा दिला आहे. (Israel-Hamas conflict)

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत ३१३ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २००० लोक जखमी झाले आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने आपल्या एका अहवालात याची पुष्टी केली आहे. शनिवारी सकाळच्या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी ज्या आठ भागात घुसखोरी केली त्या भागात अजूनही हमासचे हल्ले सुरू असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायली सैन्य गाझामध्ये पलटवार करत आहेत. यामध्ये अनेक मुलांचाही बळी गेला आहे. इस्रायल संरक्षण दलाने हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केलेल्या दक्षिणेकडील २२ स्थानांवर पुन्हा नियंत्रण मिळवले. मात्र तरीही आठ ठिकाणी त्यांच्याशी संघर्ष सुरू आहे.

इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, "भारत सरकार आणि पंतप्रधान कार्यालय इस्रायलमधील भारतीय लोकांच्या थेट संपर्कात आहे. पंतप्रधान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. इस्रायलमध्ये राहणारे भारतीय हमासच्या हल्ल्यामुळे प्रचंड घाबरले आहेत. परराष्ट्र मंत्रालय इस्रायलवर लक्ष ठेवून आहे. आम्ही नेहमीच आमच्या नागरिकांना अडचणीच्या काळात परत आणले आहे."

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news