पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने शनिवारी (दि.७) इस्रायलवर ५ हजार रॉकेल डागले. यामध्ये आतापर्यंत ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलने हमास संघटनेच्या १oo दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला असल्याचे वृत्त 'एपी' वृत्तसंस्थेने दिले आहे. Israel and hamas war)
'एपी' ने दिलेल्या वृत्तानुसार, हमास संघटनेचे आतापर्यंत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत तर १०० दहशतवाद्यांना जेरबंद केल्याची माहिती इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये १८६४ आणि पॅलेस्टाईनमध्ये १७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (Israel and hamas war)
इस्त्रायली सैन्याने असेही म्हटले आहे की, हमासने केलेल्या हल्ल्यांमध्ये आमचे २६ सैनिक मारले गेले आहेत. अपहरण करून ओलिस ठेवलेल्या दोघा जवानांची सुटका करण्यात आली आहे. परंतु सर्व ओलीस जिवंत सोडले गेले आहेत की नाही हे सांगता येत नाही, असे देखील इस्रायलने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. (Israel and hamas war)