Nushrratt Bharuccha arrives: इस्त्रायल युद्धात अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात परतली

Nushrratt Bharuccha: Bollywood Actress
Nushrratt Bharuccha: Bollywood Actress
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: हमासने शनिवारी (दि.७) इस्रायलवर ५ हजार रॉकेल डागले. यानंतर इस्रायल आणि हमास दहशतवादी गटात युद्धाला सुरूवात झाली. याच दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री नुसरत हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायला गेली होती. युद्धारंभानंतर तिच्याशी संपर्क तुटल्याने संपूर्ण बॉलिवूड चिंतेत होते. मात्र सध्याच्या अपडेटनुसार, इस्त्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरूचा मायदेशी परतली आहे. या संदर्भातील व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. (Nushrratt Bharuccha arrives)

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलहून मुंबई विमानतळावर पोहोचली असल्याचा व्हिडिओ  एएनआयने शेअर करत या संदर्भातील माहिती दिली आहे.  (Nushrratt Bharuccha arrives)

यापूर्वी अभिनेत्री नुसरत भरुच्या टीमच्या सदस्या संचिता त्रिवेदी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले होते की, अखेर अभिनेत्री नुसरत भरुच्चाच्या संपर्कात राहण्यात आम्ही यशस्वी झालो असून,दूतावासाच्या मदतीने तिला सुरक्षितपणे घरी आणले जात आहे. ती सुरक्षित आहे आणि ती लवकरच मायदेशी परतणार असल्याचे म्हटले होते. (Nushrratt Bharuccha arrives)

Nushrratt Bharuccha arrives: अभिनेत्री नुसरत 'इस्रायलला का गेली होती?

मीडियासोबत शेअर केलेल्या निवेदनात तिच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, 'नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यांच्या टीमने दिलेल्या मेसेजनुसार शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास नुसरत सोबत  शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी ती एका इमारतीच्या तळमजल्यावर सुरक्षित होती. तेव्हापासून तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही संपर्क करू शकत नसल्याचे तिच्या टीमने सांगितले आहे. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Israel-Palestine War)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news