

पुढारी ऑनलाईन डेस्क : शांत झोप हा निरोगी आरोग्याचा पाया आहे, हे वाक्य तुम्ही वारंवार एकले असेल. शांत झोपेचे शरीराला खूपच लाभ आहेत; पण तुम्हाला माहित आहे का, अनिमित झोप ( Irregular Sleep ) ही तुमच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरते. अनियमित झोपेमुळे खूप थकवा येणे, चीडचीड होणे ही कारणं तुम्हाला माहित असतीलच याचबरोबर अनियमित झोपेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसदर्भातील रोगाचा धोका वाढतो, असे नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे. जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या नवीन संशोधनातील माहिती जाणून घेवूया.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नवीन संशोधनात स्पष्ट करण्यात आले की, अनियमित झोपेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होते. हा प्लेक म्हणजे कोलेस्टेरॉल, फॅटी पदार्थ यामुळे रक्तवाहिन्या घट्ट होतात. शरीरातील रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. शरीराला पुरेसा ऑक्सिजन आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. रक्तवाहिन्यांसदर्भातील अडथळ्यामुळे हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, हृदयविकाराचा झटका, धमनी रोगा निर्माण होतात.
अनियमित झोपचे ह्दयावर होणारे दुष्परिणाम यावर झालेल्या अभ्यासात दोन हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. संशोधनात सहभागी झालेल्यांनी सलग सात दिवस झोपेची वेळ आपल्या डायरीत नमूद केले. तसेच त्यांचे झोपेची नियमितता यावरही लक्ष ठेवण्यात आले. संशोधनात सहभागी झालेल्यांच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचे मूल्यांकन केल्यानंतर संशोधकांना असे आढळले की, ज्यांचा झोपेचा कालावधी अनियमित आहे त्यांना हद्यविकाराचा त्रास होण्याची शक्यता १.४ पट जास्त असते. झोप, हृदय आणि जीवनशैली यांचा परस्पर संबंध असू शकतात, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनाबाबत शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन येथील औषध विभागाचे प्रमुख डॉ. डोनाल्ड लॉयड-जोन्स यांनी सांगितले की, 'हृदयाला विश्रांती मिळण्यासाठी झोप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा हृदय गती कमी होते आणि रक्तदाब सामान्यतः कमी होतो. झोप अनियमित असेल तर हृदय आणि रक्तवहिन्यावर अतिरिक्तताण येतो."
नवीन संशोधन अनियमित झोप आणि यामुळे हृदयावर होणार परिणाम यासंदर्भातील पहिला अभ्यास आहे, अशी माहिती अमेरिकेतील वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील एपिडेमियोलॉजी विभागातील औषधाचे सहायक प्राध्यापक केल्सी फुल यांनी दिली.
हेही वाचा :