कपिल देव टीम इंडियावर भडकले, आधी देश नंतर फ्रेंचाइझी

कपिल देव टीम इंडियावर भडकले, आधी देश नंतर फ्रेंचाइझी
Published on
Updated on

टी-20 वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर टीम इंडियावर टीका होत आहेत. भारतीय संघ 2012 नंतर प्रथमच टी-20 वर्ल्डच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. यावर विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव टीम इंडियाच्या खेळाडूंवर भडकला आहे.

"आता आमचे खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देत आहेत. मला अस वाटतंय खेळाडूंनी देशासाठी खेळण्यावर गर्व असला पाहिजे. पहिल्यांदा राष्ट्रीय टीम आणि नंतर फ्रेंचाइझी क्रिकेटला महत्व दिलं पाहिजे. अस नाही की खेळाडूंना आयपीएल खेळवलं नाही पाहिजे. बीसीसीआयने नियोजन केले पाहिजे." अस कपिल देव यांनी म्हटलं आहे.

कपिल देव पुढे म्हणाले की, 'विश्वचषक संपला की भारतीय संघाचे संपूर्ण क्रिकेट संपले, असे नाही. आयपीएल आणि वर्ल्डकपमध्ये काही काळ अंतर असायला हवे होते. आज आपल्या खेळाडूंना पुरेशा संधी मिळत आहेत, पण त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही." असही त्यांनी म्हटलं आहे.

T-20 मध्ये नवा टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण?

टी-20 विश्वचषकाच्या 'सुपर-12' फेरीतील अंतिम सामन्यात भारताने नामिबियाला (IND vs NAM) 9 विकेटस्नी सहज मात दिली. या विजयासह भारताने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट गोड केला. महत्त्वाचे म्हणजे भारताचा टी-20 कर्णधार म्हणून विराटचा तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा हा शेवटचा सामना होता..

विराट कोहली म्हणाला की, माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम मी केले आणि ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यासाठी जागा तयार करण्याची हीच वेळ आहे. टीम इंडियाने केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे. आता वेळ आली आहे की, संघाला पुढे नेण्याची जबाबदारी पुढील गटाची आहे. रोहित शर्माही इथेच आहे, तो काही काळापासून सर्व काही पाहत आहे. तसेच संघात अनेक लीडर्स आहेत, त्यामुळे येणारा काळ भारतीय क्रिकेटसाठी चांगला आहे.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news