काबूल ; पुढारी ऑनलाईन : काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणार्या 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' ( इसिस-के) ISIS या दहशतवादी संघटनेवर अमेरिकेने पलटवार केला आहे. काबूलमध्ये 'इसिस' ISIS चे दहशतवादी असणार्या नांगरहार प्रांतात आज सकाळी अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांन सांगितले. दरम्यान, अमेरिकेच्या नागरिकांनी काबूल विमानतळ तात्काळ सोडावे, असे आवाहन बायडेन सरकारने केले आहे.
काबूल विमानतळाबाहेर बुधवारी आयएसने आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. या हल्यातील मृतांची संख्या १७०झाली आहे. यामध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांसह २ ब्रिटनच्या नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यात १२७६ नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' ( इसिस-के) ही मध्य आशियातील इस्लामिक स्टेटची दहशतवादी संघटनेने घेतली हेती. याची गंभीर दखल बायडेन सरकारने घेतली. आयएसला माफी नाही. योग्यवेळी सडेतोड उत्तर देवू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी दिला होता.
काबूलमध्ये 'इसिस-के' चे दहशतवादी असणार्या नांगरहार प्रांतातील ठिकाणांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. यावेळी प्राथमिक माहितीनुसार आम्ही टार्गेट उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरलो आहोत. या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील सर्वसामान्य नागरिकांना हानी पोहचलेली नाही, असे अमेरिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
अफगाणिस्तान ची सत्ता काबीज केल्यानंतर तालिबान्यांनी जनतेला वेठीस धरले आहे. काबूलमध्ये निर्दयी कृत्य करत तालिबान्यांचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच काबूल विमानतळ परिसरात अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळ परिसरात जमलेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी आणि अन्नासाठी ते तळमळ आहेत. याचाच फायदा काळाबाजार करणारे घेत आहेत.
तालिबान्यांनी अफगाणावर कब्जा केल्यानंतर काबूला विमानतळावर एकच दहशत परसली. हजारो नागरिकांनी देश सोडण्यासाठी विमानतळावर धाव घेतल्याने एकच गोंधळ माजला आहे. तालिबान्यांनीही काबूलमध्ये क्रूरतेचे नवे चित्र रोज समोर येत आहे. भविष्यात होणार्या भयावह छळाला कंटाळून देशातील जनता पलायनासाठी घरदार आणि सर्व सामान सोडून पलायनासाठी विमानतळावर गर्दी करीत होते.
एका रिर्पाटनुसार, काबूल विमानतळावरील परिस्थिती अत्यंत विदारक आहे. अक्षरश: लूटमार सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणी व अन्नासाठी तळमळत आहेत. शेकडो नागरिकांची उपासमार सुरु आहे. काबूल विमानतळावर एक पानाची बाटली तीन हजार रुपयांना (४० डॉलर) तर राईस प्लेट तब्बल साडेसात हजार रुपये (१०० डॉलर) मोजावे लागत आहेत.
अशातच २६ ऑगस्ट राेजी काबूल विमानतळावर आयएसने आत्मघाती हल्ला केला.
या हल्यानंतर काबूलमध्ये अफरातफरी माजली हाेती.
या हल्ल्यात लहान मुलांसह अमेरिकेचे १२ सैनिक ठार झाले.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर आयएसने पुन्हा एकदा ताेंडवर काढले आहे.
ड्राेन हल्ला करत अमेरिकेने आयएसला सडेताेड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचलं का ?