Who Is Mahender Makhijani: अमेरिकेत Adult Parties, ब्लॅकमेलिंग अन् फ्रॉड... एवढे 'कांड' करणारा महेंदर माखीजानी आहे कोण?

Who Is Mahender Makhijani
Who Is Mahender Makhijanipudhari
Published on
Updated on

Who Is Mahender Makhijani: भारतीय वंशाच्या फायनान्सर महेंदर माखीजानी याला कॅलिफोर्नियात १०० मिलियन डॉलर बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो कथितरित्या दुहेरी आयुष्य जगत होता. तो धमकावणे आणि ब्लॅकमेल करण्याच्या जोरावर एक विलासी आयुष्य जगत होता. तो ज्या पार्टी आयोजित करत होता त्यात देह विक्री करणाऱ्या महिलांचा देखील वापर केला जात होता. नंतर याच व्हिडिओंचा वापर दबाव टाकण्यासाठी केला जात होता अशी माहिती न्यूयॉर्क पोस्टने दिली आहे.

Who Is Mahender Makhijani
Kalyan Marriage Fraud : लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी घातला व्यावसायिकाला ५५ लाखांना गंडा

कोण आहे माखीजानी?

महेंदर माखीजानीवर खोटी रिअल इस्टेट कागदपत्रे दाखवून स्थानिक बँकेचे जवळपास १०० मिलियन डॉलर बुडवले असल्याचे आणि तारण दाखवून प्रॉपर्टींचे मुल्य वाढवल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून या प्रकरणी अजून दिलेले कर्ज वसूल करून घेण्यात आलेलं नाही. तो हा घोटाळा करण्यासाठी न्यूपोर्ट बीच बेस कँटोर ग्रुप V LLC आणि नेटवर्क कंपन्यांचा वापर करत होता. तो आणि त्याच्या साथीदारांनी सप्टेंबर २०२४ आणि एप्रिल २०२५ दरम्यान इन्श्युरन्स रेकॉर्डमध्ये छेडछाड केली होती. त्यांनी एडोब सॉफ्टवेअर, मेटा डेटा बदलणे आणि खोटी कागदपत्रे बँकेत सादर करून हा घोटाळा केला.

Who Is Mahender Makhijani
Digital Arrest Fraud: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठाला सव्वाकोटीचा गंडापोलीस अधिकारी असल्याचा बनाव

न्यायालयात सादर झालेल्या कागदपत्रांनुसार तसेच साक्षीदारांनी दिलेल्या वक्तव्यांवरून हा महेंदर काही खासगी पार्ट्या देखील आयोजित करत होता. त्यात ड्रग्ज आणि देहविक्री करणाऱ्या महिलांचा देखील समावेश असायचा. यातील काही पार्ट्या या बँक अधिकाऱ्यांनी देखील अटेंड केल्या आहेत. त्यानंतर तो या पार्ट्यांचा वापर तो पार्टीत आलेल्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी करत होता. याद्वारे तो बँकेतील स्टाफला कंट्रोल करायचा.

एवढंच नाही तर तो आपल्या सहकाऱ्यांना देखील मारून टाकण्याची धमकी देत होता. तो त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची धमकी द्यायचा. तो आपल्या कारवाया धमकी आणि हिंसेच्या जोरावर चालवत होता. तो आपल्या सहकाऱ्यांना प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करणे, त्यांचा बिजनेस उद्धवस्त करणे आणि स्पर्धकांवर दाबव टाकण्याचे आदेश देत होता. एका प्रकरणात तर त्याने आपल्या विरोधातील व्यक्तीच्या कुटुंबियांना घर खाली करण्याची नोटीस दिली होती. त्याने त्यांच्यावर चोरीचा आरोप केला होता.

Who Is Mahender Makhijani
IIM graduate job scam: IIM पदवी धारक महिलेला घातला गंडा... ऑफर लेटर, जॉईनिंग डेट अन् कंपनीच गायब; ७५ हजार गेले पाण्यात

पोलिसांनी केली अटक

दरम्यान, पोलिसांनी बुधवारी सकाळी त्याला त्याच्या घरातून अटक केली. सशस्त्र पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर त्याला बेड्या ठोकून तुरूंगात टाकण्यात आलं. त्याला त्याच्या घरातली पायजम्यावरच अटक करण्यात आली होती.

माखीजानी हा एक विलासी आयुष्य जगत होता. तो प्रायव्हेट जेटमधून फिरत होता. डिझायनर कपडे वापरायचा. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यात बेंटली, पोर्शे, मर्सिडीस जी वॅगनचा देखील समावेश आहे. त्याचे लागून दोन मेन्शन्स आहेत. त्यातील एक हे त्याच्या सासरच्या मंडळींसाठी राखीव आहे.

त्याच्या संपत्तीचा मोठा भाग अजूनही तपास यंत्रणांच्या रडारवर आलेला नाही. तक्रारीत म्हटलं गेलं आहे की माखीजानीकडे प्रचंड संपत्ती आहे. मात्र सरकारला अजूनही त्याच्या संपूर्ण रिसोर्सेपर्यंत जाता आलेलं नाही. अनेक बाबतीत त्याने ती संपत्ती माखीजानी या नावावर घेतलेली नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news