IIM graduate job scam: IIM पदवी धारक महिलेला घातला गंडा... ऑफर लेटर, जॉईनिंग डेट अन् कंपनीच गायब; ७५ हजार गेले पाण्यात

IIM graduate job scam
IIM graduate job scamPUDHARI
Published on
Updated on

IIM graduate job scam viral post : बोध गया येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची डिग्री घेतल्यानंतर विद्यार्थिनी आपलं आयुष्य आता बदलणार या आशेवर दिल्लीत जॉब करण्यासाठी गेली. मात्र ज्या कंपनीने तिला ऑफर लेटर, जॉईनिंग डेट दिली होती. मात्र कथित कंपनी या तरूणीसोबत प्रत्येक टप्प्यावर खोटं बोलत होती. याबाबतची माहिती पीडित विद्यार्थिनीने लिंक्डइनवर पोस्ट करून दिली.

IIM graduate job scam
Muslim Reservation Issue: हायकोर्टामुळे 9 वर्षांनी अखेर फारुख 'इंजिनीअर' झालाच,एका निर्णयामुळे बीडच्या तरुणाला काय फटका बसला?

ऑफिस जागेवर नव्हतं

तरूणी आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, 'मी २०२६ मध्ये बोधगया मधील IIM संस्थेतून एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर मला एक ऑफर लेटर आलं. जॉयनिंग डेट देखील आले अन् एक आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर मी माझी बॅग भरली आणि दिल्लीला शिफ्ट झाले. या स्थलांतरासाठी जवळपास ७५ हजार रूपये खर्च केले. मला विश्वास होता की एक शाश्वत नोकरी माझ्या वाट पाहत आहे.'

मात्र या विद्यार्थिनीने दिल्लीत पोहचल्यानंतर तिला धक्का बसल्याचं सांगितलं. ती म्हणाली तिथं ऑफिसच नव्हते. तिच्या पोस्टमध्ये ती सांगते की ज्यावेळी ती ४ मे रोजी तिला देण्यात आलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहचली त्यावेळी ती आता आपण कामाला सुरूवात करायची अशी अपेक्षा करत होती. मात्र त्या जागेवर कोणतंही ऑफिस नव्हतं.

IIM graduate job scam
Engineering Degree Struggle : खेळणी विकणाऱ्याच्या मुलाच्या पदवीचाही प्रशासनाने केला खेळ

नेमकं काय झालं?

विद्यार्थिनी म्हणते, '४ मे रोजी मी ऑफिसच्या पत्त्यावर बाहेर उभी होती. तिथं कोणतेच ऑफिस नव्हते. मी तिथं दोन तास उभी होते. मी कॉल केले, मेसेज केले. कोणतेच उत्तर आले नाही. नंतर तिला हे भाड्याचे ऑफिस होते ते बंद झाले आहे असं सांगण्यात आलं.

एवढंच नाही तर IIM ग्रॅज्युएट असलेल्या या विद्यार्थिनीला या कंपनीकडून आयडी कार्ड पाठवण्याचे आश्वासन देखील देण्यात आलं. तसेच तिच्यासाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा देखील करून दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र ते सर्व खोटं होतं.

कथित कंपनी या विद्यार्थिनीला अजून दोन ते तीन दिवस थांबा असं सतत सांगत होती. मात्र अनेक आठवडे झाले तरी नोकरीवर रुजू झाली नव्हती. नंतर तिला जुलैपूर्वी कोणतंही जॉयनिंग होणार नाही असं सांगण्यात आलं.

IIM graduate job scam
Fraud Case : मेडिकल कॉलेजमध्ये पीजी प्रवेशाचे आमिष; व्यावसायिकाला घातला २० लाखांचा गंडा

पैसा खर्च झाला

ज्यावेळी ती या नोकरीसाठी वाट पाहत होती त्यावेळी तिच्याकडे पैसे देखील संपत होते. विद्यार्थिनी म्हणाली की, जर कंपनीने मला आधीच तिच्या जॉयनिंगला वेळ होणार आहे असं सांगितलं असतं तर माझे दिल्लीत स्थलांतरित होण्याचे पैसे तरी वाचले असते. जरी त्यांनी एक आठवडा आधी खरी परिस्थिती सांगितली असती तर मी हा खर्च केला नसता.'

विद्यार्थिनीने पुढा दावा केला की, ज्यावेळी मी दिल्लीत स्थलांतरित झाल्याचा खर्च पुन्हा मागितला त्यावेळी त्यांनी आधी मला आश्वासन दिलं. नंतर सीईओने मला प्रतिक्रियाच देणे थांबवले. मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्यात आलं.

IIM graduate job scam
Engineer Salary: फक्त 9 रुपये पगारवाढ! इंजिनिअर संतापला, म्हणाला, गुलामासारखं काम करतोय... सोशल मीडियावर मांडली व्यथा

खर्च परवडणारा नव्हता मात्र..

या तरुणीने जो काही अनुभव आला तो आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या थकवणार होता. विशेषकरून जे एकटे नवीन शहरात जाणारे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी हा वाईट अनुभव आहे. आता या तरूणीने दिल्लीत खर्च झालेले तिचे ७५ हजार रूपये परत मागितले आहेत. मला इतके पैसे खर्च करणे परडवणारे नव्हते मात्र मला नोकरी मिळाली आहे या विश्वासावर हे खर्च केले.

IIM graduate job scam
dating fraud case | 'डेटिंग'च्या जाळ्यात ५०० महिला अडकल्या! लग्नाचे आमिष दाखवून २ कोटींचा गंडा घालणारा महाठग जेरबंद

या तरूणीने माझ्याकडे ऑफर लेटर होते. माझ्याकडे पुरावा होता. माझ्याकडे आशा होती. सध्याच्या घडीला आता फक्त ही पोस्ट आहे. आशा आहे की संबंधित व्यक्ती ही पोस्ट वाचेल.'

या तरूणीने आयआयएम बोध गयामधील प्लेसमेंट कमिटीने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मला दुसरा जॉब शोधण्यासाठी मदत केली असे देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ती आता तरूणांना सल्ला देतेय की तुम्ही प्रत्येक गोष्ट कागदावर घ्या, आश्वासन, तारखा प्रत्येक मेसेजचा पुरावा घ्या.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news