US Venezuela Oil Deal: जगातील सर्वात मोठा तेल करार, व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरल तेलावर अमेरिकेचा कब्जा; ट्रम्प यांचा दावा

इराणसोबतचा वाढता तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर लागलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासोबत जगातील आजवरचा सर्वात मोठा तेल करार केल्याचे जाहीर केले आहे.
US Venezuela Oil Deal
US Venezuela Oil DealAI Image
Published on
Updated on

US Venezuela Oil Deal

नवी दिल्ली: इराणसोबतचा वाढता तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर लागलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलासोबत जगातील आजवरचा सर्वात मोठा तेल करार केल्याचे त्यांनी आज जाहीर केले. अमेरिकन नागरिकांचे हित जपण्यासाठी आणि देशातील इंधनाचे दर कमी करण्यासाठी हा करार करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या करारामुळे व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरलपेक्षा अधिक तेलाच्या साठ्यावर आता अमेरिकेला नियंत्रण मिळाले आहे.

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना लिहिले, “माझ्या निर्देशानुसार परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षांसोबत चर्चा करून हा करार अंतिम केला आहे. या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरलच्या तेल साठ्यावर आपले नियंत्रण आले असून, यात अमेरिकन नागरिकांच्या हिताशी कोणतीही तडजोड केलेली नाही.” या करारामुळे अमेरिकेत इंधनाचा पुरवठा दुप्पट होणार असून गॅसच्या किमती कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

US Venezuela Oil Deal
CNG price hike: वाहनधारकांना झटका!सीएनजीच्या दरांत मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

दुसरीकडे, व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, अमेरिकेने पायाभूत सुविधा आणि तेल उद्योगाला चालना देण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. या करारामुळे व्हेनेझुएलातील तेल उत्पादन वाढून खासगी कंपन्यांना मोठा फायदा होईल. अमेरिकेच्या मदतीने १७ तेल प्रकल्पांचा विकास केला जाणार असून, यामुळे १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे.

व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने स्थापन होणाऱ्या खासगी संयुक्त उपक्रमात अमेरिकेची ५५ टक्के भागीदारी असेल. यामुळे ही जगातील दुसरी सर्वात मोठी खासगी तेल साठवणूक कंपनी ठरेल. अमेरिकेचा उद्देश स्वतःच्या अटींवर जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा करण्याची क्षमता निर्माण करणे हा आहे, जेणेकरून 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरील अवलंबित्व कमी करता येईल.

भारताकडूनही व्हेनेझुएलातून तेलाची आयात वाढली

इराण संघर्ष आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर भारतानेही कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी लॅटिन अमेरिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या 'केप्लर'च्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारताच्या व्हेनेझुएलाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी वाढ झाली असून, हा देश भारताचा चौथा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे. व्हेनेझुएलाकडून भारताला दररोज सुमारे ४,४४,००० बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा झाला, जो इराकमधून होणाऱ्या १,१८,००० बॅरल आणि अमेरिकेकडून होणाऱ्या १,५३,००० बॅरल प्रतिदिन पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.

एप्रिलमध्ये आयात पुन्हा सुरू झाल्यापासून, भारताच्या पुरवठा स्रोतांच्या वैविध्यीकरणात व्हेनेझुएलाचा वाटा वेगाने वाढला आहे. पश्चिम आशियातून होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानंतर, भारतीय रिफायनरीजनी रशियन तेलावरील मोठे अवलंबित्व कायम ठेवत व्हेनेझुएला, ब्राझील आणि आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे.

US Venezuela Oil Deal
Government Stake Sale | सरकारी कंपन्यांमधील ६२ हजार कोटींचा हिस्सा विकला; कच्च्या तेलाच्या भाववाढीमुळे विक्रीचे ७८ टक्के उद्दिष्ट पाच महिन्यांतच पूर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news