US Iran Ceasefire: अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढणार; शांतता चर्चांबाबत अनिश्चितता कायम, युद्धविराम संपणार?

US Iran Ceasefire News: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम लवकरच संपण्याचा इशारा दिला आहे. शांतता चर्चांसाठी अजून इराणचे प्रतिनिधी पाकिस्तानकडे रवाना झालेले नाहीत.
US Iran Ceasefire News
US Iran Ceasefire NewsPudhari
Published on
Updated on

US Iran Ceasefire News: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याचा युद्धविराम फार काळ टिकणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनच्या वेळेनुसार बुधवारी संध्याकाळपर्यंत हा युद्धविराम थांबू शकतो, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी युद्धविराम वाढण्याची शक्यता कमी असल्याचेही स्पष्ट केले. कोणताही करार न झाल्यास तणाव वाढू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शांतता करार करण्यासाठी पाकिस्तानमध्ये बैठक आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स पुन्हा इस्लामाबादला जाण्यास तयार असल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. मात्र, इराणकडून अजून कोणतेही प्रतिनिधीमंडळ पाकिस्तानकडे रवाना झालेले नाही, अशी माहिती इराणी सरकारी माध्यमांनी दिली आहे.

US Iran Ceasefire News
Yusuf Pathan: मुंबई पोलिसांची कारवाई; क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या सासऱ्याला आणि मेहुण्याला अटक, काय घडलं?

या सगळ्या घडामोडींमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहे. काही अहवालांनुसार, इस्रायलने अमेरिकेवर लष्करी कारवाईसाठी दबाव टाकल्याचा आरोप केला जात होता. मात्र ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

US Iran Ceasefire News
IPL 2026: एका ओव्हरमध्ये 43 रन आणि 7 सिक्स ठोकणारा चेन्नई सुपर किंग्सचा तुफान फलंदाज चर्चेत; कोण आहे हा पठ्ठ्या?

सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक असून, पुढील काही दिवसांत काय निर्णय होतो यावर या संघर्षाचे भवितव्य ठरणार आहे. जर चर्चा यशस्वी झाली नाही, तर युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा संघर्ष सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news