Yusuf Pathan: मुंबई पोलिसांची कारवाई; क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या सासऱ्याला आणि मेहुण्याला अटक, काय घडलं?

Yusuf Pathan Mumbai Case: मुंबईत किरकोळ वादातून मोठी मारहाण झाली असून युसूफ पठाण यांच्या सासऱ्याला आणि मेहुण्याला अटक झाली.
Yusuf Pathan Mumbai Case
Yusuf Pathan Mumbai CasePudhari
Published on
Updated on

Yusuf Pathan Mumbai Case: मुंबईत एका किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्या सासऱ्यासह मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने हा प्रकार घडला आहे.

कसा सुरू झाला वाद?

घटनेची सुरुवात अगदी छोट्या कारणाने झाली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून एक कार गेल्यानंतर ते पाणी युसूफ खान नावाच्या व्यक्तीवर उडालं. या घटनेनंतर त्यांच्यात वाद झाला. या वादात युसूफ पठाण यांचा मेहुणा शोएब खान सहभागी झाला आणि त्याने युसूफ खान यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

तक्रार देण्यासाठी जात असताना पुन्हा हल्ला

युसूफ खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पोलिसांत तक्रार देण्यासाठी जात असताना पठाण यांचे सासरे खालिद खान आणि इतर नातेवाईकांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. या वेळी परिस्थिती आणखी चिघळली.

बेसबॉल बॅट आणि काठ्यांनी मारहाण

या हल्ल्यात आरोपींनी काठ्या आणि बेसबॉल बॅटचा वापर केल्याचा आरोप आहे. यात तक्रारदाराच्या नातेवाईकांना गंभीर दुखापत झाली आहे. एका व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला असून आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती आहे.

Yusuf Pathan Mumbai Case
Who is John Ternus: ॲपल कंपनीचे नवे CEO जॉन टर्नस कोण आहेत? किती आहे संपत्ती? जाणून घ्या त्यांचा प्रवास

पोलिसांची कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालिद खान आणि शोएब खान यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर भायखळा येथील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात सहभागी असलेला शहबाज खान सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news